शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; हिस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मुलगा ठार; मोहोळ तालुक्यातील वाळुज येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 22:11 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

संभाजी मोटे

वाळूज : वाळूज (ता. मोहोळ ) येथील खरात वस्तीवर मंगळवारी दुपारच्या सुमारास हिस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात एका दहावर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 

अनिकेत अमोल खरात (वय १०) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मयत अनिकेत हा लहान भावंडासोबत वस्तीवर खेळत बसला होता. दरम्यान, अनिकेत हा प्रांतविधीसाठी मक्याच्या शेतामध्ये गेला असता परत येताना एका प्राण्याने त्याला मकाच्या फडात ओढत नेले. तेंव्हा इतर भावंडांनी आरडाओरड केली.

याबाबत माहिती मिळताच आई, वडील आणि आजोबा शेतात पोहचले तेंव्हा मुलाच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले. तात्काळ त्यास उपचारासाठी मोहोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले असता डॉक्टरांनी अनिकेत यास मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टिम वाळुज येथे दाखल झाली.

दरम्यान, हल्ला कोणत्या प्राण्याने केला हे अद्याप समजू शकले नाही. मयत अनिकेत हा आई, वडिलांना एकूलता एक मुलगा होता, त्याचे वडिल गुळवंची येथील माध्यमिक विद्यालयात सेवक पदावर कार्यरत आहेत. या घटनेची नोंद मोहोळ पोलीस स्टेशन येथे झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातmohol-acमोहोळ