शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

शरद बनसोडेंच्या विजयाने शहरात ठिकठिकाणी जल्लोष

By admin | Updated: May 17, 2014 01:05 IST

कहीं दीप जले, कहीं दिल : काँग्रेसमध्ये सन्नाटा तर भाजपाकडून विजयोत्सव साजरा

 

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्या विजयाची घोषणा होताच, शहरात ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करीत ‘अब की बार मोदी सरकार...’ असा जयघोष करीत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शुक्रवारी सकाळपासून शासकीय गोदाम येथे मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. शरद बनसोडे हे आघाडीवर असल्याने ९ व्या फेरीतील ५२ हजारांचा लीड जाहीर झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करण्यास सुरुवात केली. दुपारी २ वा. निकाल जाहीर होताच आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नवीपेठ येथील संपर्क कार्यालयाजवळ लोकांनी मोठी गर्दी केली. ढोल ताशांच्या आवाजात गुलालाची उधळण करीत भगवे झेंडे उंचावून कार्यकर्ते बेधुंद होऊन नाचत होते. दुपारी ३ वा. अ‍ॅड. शरद बनसोडे हे कार्यालयात आले तेव्हा कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत त्यांचे स्वागत केले. हार घालून, फेटे बांधून कार्यकर्त्यांनी अब की बार मोदी सरकार...बनसोडे साहेबांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सिद्रामप्पा पाटील, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, नगरसेवक अमर पुदाले, अविनाश पाटील, संजय कोळी, पिंटू महाले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बनसोडे यांच्या निवडीबद्दल रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) च्या वतीने सिद्धार्थ चौक येथे जल्लोष करण्यात आला. रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते मिठाईचे वाटप करण्यात आले.