एटीपीतून सात लाखांची चोरी

By Admin | Updated: June 25, 2014 01:46 IST2014-06-25T01:46:53+5:302014-06-25T01:46:53+5:30

सात रस्ता केंद्रातील प्रकार

Seven lakhs of stolen from ATP | एटीपीतून सात लाखांची चोरी

एटीपीतून सात लाखांची चोरी


सोलापूर : महावितरणच्या सात रस्ता चौकातील एटीपी (एनी टाईम पेमेंट) सेंटर फोडून चोरट्याने ६ लाख ९२ हजारांची रोकड व धनादेश लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली.
प्रवीण उद्धवराव कुलकर्णी (वय ३०, रा. १/१, गणेश बिल्डर हौसिंग सोसायटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आली आहे. महावितरण कंपनीने सात रस्ता चौकात शासकीय विश्रामगृहाशेजारी विजापूर महामार्गाकडेला कित्येक दिवसांपासून एटीपी सेंटर उघडले आहे. कुलकर्णी यांनी हे सेंटर २३ जून रोजी रात्री दहा वाजता बंद केले. आज (मंगळवार) सकाळी आठ वाजता सेंटर उघडण्यास गेल्यावर त्यांना प्रवेशद्वाराच्या लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडण्यात आल्याचे आढळले. आत पाहिल्यावर मशीनचे कॅश काऊंटर उचकटून चोरट्याने आतील ६ लाख ९२ हजार ४६० रुपये व बिलापोटी ग्राहकांनी दिलेले वेगवेगळ्या बँकांचे धनादेश चोरून नेल्याचे निदर्शनाला आले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पो. नि. जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. एटीपी मशीन फोडून पैसे पळविण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. इतकी रक्कम असताना केंद्रातील सुरक्षेबाबत कसलीच काळजी घेतल्याचे दिसून आले नाही.

Web Title: Seven lakhs of stolen from ATP