सेवानिवृत्तीनिमित्त संजय डिकोळे यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:20 IST2021-01-22T04:20:33+5:302021-01-22T04:20:33+5:30

कुर्डूवाडी : येथील आंतरभारती प्रशालेत ३८ वर्षांच्या सेवेतून निवृत्त झालेले संजय डिकोळे यांचा सत्कार आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते ...

Sanjay Dikole's honor on the occasion of retirement | सेवानिवृत्तीनिमित्त संजय डिकोळे यांचा गौरव

सेवानिवृत्तीनिमित्त संजय डिकोळे यांचा गौरव

कुर्डूवाडी : येथील आंतरभारती प्रशालेत ३८ वर्षांच्या सेवेतून निवृत्त झालेले संजय डिकोळे यांचा सत्कार आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश कदम, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, जनता बँकेचे अध्यक्ष अर्जुन बागल, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास, उपनगराध्यक्षा ऊर्मिला बागल, डॉ. विलास मेहता, प्रकाश शहा, अजित पवार, अशोक ढेपे, चंदूकाका शेंडे, गणेश शेटे, महेश गांधी, यासीन बहामद, दत्ता काकडे, सुरेश बागल, रवींद्र ठोकडे, रणजित शिनगारे, ॲड. प्रमोद पलसे, राजेश गांधी, नवनाथ बागल, दयानंद पवार, चंदूलाल म्हमाणे उपस्थित होते.

यावेळी डॉ. संजय दास यांनी डिकोळे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. सध्याच्या काळात एकीकडे माणुसकी संपत चालली आहे. एखाद्या क्षेत्रातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याचा सत्कार होणे म्हणजे भाग्यच म्हणावे. संजय डिकोळे म्हणजे कामावर आणि काम करणाऱ्या माणसांवर प्रेम करणारे प्रेमळ व्यक्तिमत्त्व होय, असे दास म्हणाले.

..............

फोटो : २१ संजय डिकोळे

आंतरभारती विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले संजय डिकोळे यांचा सत्कार करताना आमदार संजयमामा शिंदे. यावेळी धनंजय डिकोळे, समीर मुलाणी, डॉ. राजेंद्र दास, डॉ. विलास मेहता, डॉ. दिनेश कदम.

Web Title: Sanjay Dikole's honor on the occasion of retirement