शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्यामुळे राज-उद्धव एकत्र"; प्रताप सरनाईक यांची स्पष्ट प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 18:19 IST

एकमेकांच्या घरी चहा-जेवणाला गेले तर त्यात बातमीसारखे काही नाही, असेही सरनाईक यांनी म्हटलं.

सोलापूर : राज आणि उद्धव हे एकाच घरातील, एकाच संस्कृतीतले. ते एकमेकांच्या घरी चहा-जेवणाला गेले तर त्यात बातमीसारखे काही नाही. ते एक कुटुंब आहे, एकमेकांच्या सुख-दुःखात जाणे स्वाभाविक आहे. राजकारणाने त्यात अर्थ आणू नका. तसेच, आमच्यामुळे हे दोघे भाऊ पुन्हा जवळ आले, याचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शुक्रवारी दुपारी सोलापूर बस स्थानकाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राणे बंधूंबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरनाईक म्हणाले, हा दोन भावांमधील वैयक्तिक वाद नाही. पैशांच्या वाटपाबाबत काही तक्रारी असतील तर त्याची माहिती पोलिस किंवा प्रशासनाला देण्याचा अधिकार कोणालाही आहे. यात भांडण कुठे? नीलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत, नितेश राणे मंत्री आहेत. दोघेही लोकांचे प्रश्न पुढे आणतात. त्यांची भूमिका वेगळी असू शकते, पण ते भांडताहेत असे नाही.

रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर बोलताना सरनाईक म्हणाले की, युतीबाबत २ डिसेंबर म्हणाले; पण, कोणते वर्ष सांगितले? त्यांच्या वक्तव्याचा गैरअर्थ लावण्याचे काही कारण नाही. ते माझे बालपणापासूनचे मित्र आहेत. युतीबाबत माध्यमांत येणाऱ्या चर्चा या अनावश्यक अटकळ असल्याचे ते म्हणाले.

शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी हॉटलाइन

शाळकरी मुलांच्या वाहतुकीबाबत बोलताना सरनाईक म्हणाले, राज्यात आम्ही स्पष्ट सूचना दिल्या आहेत की शाळकरी विद्यार्थी वेळेत घरी पोहोचले पाहिजेत. एसटी महामंडळाने यासाठी हॉटलाइन सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास ते थेट संपर्क करू शकतात. मला सर्वांत समाधान वाटते ते म्हणजे, सरकार विद्यार्थ्यांच्या तक्रारी तत्काळ ऐकतेय. यामुळे मुलांना सुरक्षिततेचे बळ मिळत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : We Brought Raj and Uddhav Together: Pratap Sarnaik's Clear Statement

Web Summary : Minister Pratap Sarnaik stated Raj and Uddhav are family; their reunion is welcomed. He dismissed conflict claims between Rane brothers and downplayed speculation about alliance with BJP. A student safety hotline has been launched by ST Corporation.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे