शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे तिकीट दरवाढीचा निषेध

By admin | Updated: June 24, 2014 01:36 IST

माकपची निदर्शने : दरवाढ मागे घेण्याची मागणी

सोलापूर : रेल्वे तिकीट दरात १४.२ टक्के वाढ केल्याच्या निर्णयाचा विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवला. वाढीव तिकीट दराचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. चक्का जाम करू- आडम मास्तरभारतीय जनतेला ‘अच्छे दिन आने वाले है’ नारा देत सत्ता काबीज केली़ रेल्वेच्या दरात वाढ करुन जनतेचा विश्वासघात केला आहे़ ही दरवाढ मागे नाही घेतली तर सोलापूर शहरात चक्का जाम करु, असा इशारा माकपाचे नेते नरसय्या आडम यांनी दिला़ सोमवारी सकाळी विभागीय कार्यालयासमोर माकपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक थॉमस यांना निवेदन सादर केले़ मात्र व्यवस्थापकांनी या शिष्टमंडळासमवेत चर्चा करायला नकार दर्शविला़ कार्यकर्त्यांचा संताप पाहता ते चर्चेला तयार झाले़ या निदर्शनात एम़ एच़ शेख, नसीमा शेख, माशप्पा विटे, व्यंकटेश कोंगारी, शेवंताबाई देशमुख, युसूफ मेजर, रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे, सलीम मुल्ला, फातिमा बेग, महिबूब हिरापुरे, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, सिद्धाराम उमराणी, बाबू कोकणे, दीपक निकंबे, दत्ता चव्हाण, अनिल वासम, प्रशांत म्याकल, सनी शेट्टी, रवी म्हेत्रे, नरसिंग म्हेत्रे, बाळकृष्ण म्याकल आदी सहभागी झाले होते़ -----------------------------------रेल्वे प्रवासी संघटनेचा अनोखा निषेधप्रवाशांना तिकिटाची वाढीव रक्कम देऊन सोलापूर रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे तिकीट दरवाढीचा रविवारी रेल्वे स्थानकावर जोरदार निषेध नोंदवत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबलेल्या प्रवाशांना वाढीव रक्कम देऊन अनोखा निषेध नोंदवला. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव, अ‍ॅड. खतीब, नितीन नवगिरे, सतीश शिंदे, राजेंद्र कांबळे, अ‍ॅड. कुमार कापसे, मन्सूसिंग बाबावाले, दुबय्या इराबत्ती आदी सामील झाले होते.