शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रायचूर-विजयपूर, कलबुर्गी-सोलापूर, वाडी-सोलापूर रेल्वेगाड्या रद्द

By appasaheb.patil | Updated: October 17, 2019 18:50 IST

तीन दिवसांसाठी रेल्वेचा ब्लॉक; तिलाटी रेल्वेस्थानकादरम्यान होणार काम

ठळक मुद्देसोलापूर-वाडी सेक्शनदरम्यान बहुतांश गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्याकाही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आह़ेसोलापूर विभागावरून धावणाºया पॅसेंजर गाड्या रद्द

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील तिलाटी रेल्वेस्थानकादरम्यान नॉनइंटरलॉकच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून १७ ते २० आॅक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला आहे़ या कामामुळे रायचूर-विजयपूर, कलबुर्गी-सोलापूर व वाडी-सोलापूर या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़ याशिवाय अन्य गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील तिलाटी रेल्वेस्टेशनवर नॉनइंटरलॉकिंग कामाकरिता १७ ते २० आॅक्टोबर या कालावधीत सोलापूर विभागावरून धावणाºया पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आह़े सोलापूर-वाडी सेक्शनदरम्यान बहुतांश गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत़ दरम्यान, गाडी क्र. ५७१३४ रायचूर-विजयपूर पॅसेंजर ही गाडी कलबुर्गी स्थानकापर्यंत धावणार आहे़ हीच गाडी कलबुर्गी स्थानकावरून गाडी क्र. ५७१३३ विजयपूर-रायचूर पॅसेंजर म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. कलबुर्गी स्थानक आणि सोलापूर स्थानकादरम्यान गाडी क्र. ५७१३४ रायचूर-विजयपूर पॅसेंजर धावणार नाही. 

याशिवाय गाडी क्र. ५७१३३ विजयपूर- रायचूर पॅसेंजर सोलापूर स्थानकापर्यंत धावेल. सदर गाडी सोलापूर स्थानकावरून गाडी क्र. ५७१३४ रायचूर- विजयपूर पॅसेंजर म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. सोलापूर स्थानक आणि कलबुर्र्र्र्गी स्थानकादरम्यान गाडी क्र. ५७१३३ विजयपूर-रायचूर पॅसेंजर धावणार नाही. गाडी क्र. ५७६२८ कलबुर्र्र्र्गी -सोलापूर पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी गाड्यामध्ये परिवर्तन झाल्याची नोंद घ्यावी व आपला प्रवास सुनिश्चित करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने केले आहे़ 

सोलापूर-फलकनुमा पॅसेंजर धावणार नाही- कलबुर्र्र्र्गी स्थानकावरून गाडी क्र. ५७६५९ सोलापूर-फलकनुमा पॅसेंजर आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. गाडी क्र. ५७६५९ सोलापूर-फलकनामा पॅसेंजर सोलापूर स्थानक आणि कलबुर्र्र्र्गी स्थानकादरम्यान धावणार नाही. गाडी क्र. ७१३०६ वाडी-सोलापूर डेमू कलबुर्र्र्र्गी स्थानकापर्र्यंत धावेल. सदर गाडी कलबुर्र्र्र्गी स्थानकावरून गाडी क्र. ७१३०१ सोलापूर-गुंटकल डेमू म्हणून आपल्या निर्धारित वेळेवर धावेल. गाडी क्र. ७१३०६ कलबुर्र्र्र्गी -सोलापूर स्थानकादरम्यान धावणार नाही आणि गाडी क्र. ७१३०१ सोलापूर-कलबुर्र्र्र्गी स्थानकादरम्यान धावणार नाही. 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे