शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

 लोकमत ‘स्पर्धेच्या जगात’ लेखमालेचे सोलापूरात प्रकाशन

By appasaheb.dilip.patil | Updated: July 29, 2017 11:15 IST

सोलापूर दि २९ : विद्यार्थ्यांनी भविष्याकडे बघताना विशाल दृष्टिकोन तर ठेवावाच लागतो, पण मानवी मूल्यांची शिस्त, ध्येय, उत्साह, आत्मविश्वास आणि स्वत:शीच स्पर्धा करणे या पंचसूत्रीचा अंगीकार करून स्वत:ला घडवावे, असे प्रतिपादन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले. 


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २९ : विद्यार्थ्यांनी भविष्याकडे बघताना विशाल दृष्टिकोन तर ठेवावाच लागतो, पण मानवी मूल्यांची शिस्त, ध्येय, उत्साह, आत्मविश्वास आणि स्वत:शीच स्पर्धा करणे या पंचसूत्रीचा अंगीकार करून स्वत:ला घडवावे, असे प्रतिपादन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले. 
लोकमतच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या ‘स्पर्धेच्या जगात’ या अंकाचे प्रकाशन आज भारती विद्यापीठात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी लोकमतचे संपादक राजा माने, सहाय्यक सरव्यवस्थापक रमेश तावडे, भारती विद्यापीठाचे प्राचार्य रणशृंगारे आदी उपस्थित होते.
आजच्या स्पर्धेच्या जगातही विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी आणि घडण्यासाठी भरपूर क्षेत्रे आहेत. डॉक्टर, इंजिनियर या क्षेत्रात स्पर्धा आहे. तेव्हा ही क्षेत्रे वगळता इतर कोणत्या क्षेत्रात आपण चांगले योगदान देऊ शकतो, याचा ठाम निर्णय विद्यार्थ्यांनी स्वत: घ्यावा, असे सांगून राजेंद्र भारुड म्हणाले की, आयुष्यात आपण आपले ध्येय प्रथम निश्चित केले पाहिजे. जे करायचे ते चांगलेच करायचे हे निश्चित केले पाहिजे.
ते पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे तेवढी महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. आपल्या अंगी त्यासाठी शिस्त असली पाहिजे, केवळ सोयीचे म्हणून कोणतीही गोष्ट न स्वीकारता आव्हान म्हणून स्वीकारली पाहिजे. 
---------------------------
शेवटच्या बाकावरचा विद्यार्थी
आपल्या कॉलेजमधील पहिल्या दिवसाची आठवण सांगताना राजेंद्र भारुड म्हणाले की, पहिल्या दिवशी स्लीपर घालून आलेल्या माझ्याकडे अनेकांनी कुत्सित नजरेने पाहिले. त्यामुळे मी सर्वात शेवटच्या बाकावर जाऊन बसलो. पण त्याच वेळी ठरवले की, एक ना एक दिवस आपण सन्मानाने यांच्यासोबत पुढे बसायचे. हीच महत्त्वाकांक्षा, जिद्द आपल्याला आयुष्यात यशस्वी करून गेली.