सांगोल्याहुन धावणाऱ्या १०० व्या किसान रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखविणार हिरवा झेंडा

By appasaheb.patil | Published: December 28, 2020 10:16 AM2020-12-28T10:16:18+5:302020-12-28T10:16:26+5:30

सोलापूर लोकमत विशेष...

Prime Minister Narendra Modi will show the green flag to the 100th Kisan Railway running from Sangola | सांगोल्याहुन धावणाऱ्या १०० व्या किसान रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखविणार हिरवा झेंडा

सांगोल्याहुन धावणाऱ्या १०० व्या किसान रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखविणार हिरवा झेंडा

Next

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २८ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालीमार पर्यंत धावणाऱ्या 100 व्या किसान रेल्वेला झेंडा दाखवून रवाना करतील

यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि  पीयूष गोयल देखील उपस्थित राहणार आहेत.

या अनेक प्रकारच्या मालाच्या एकत्रित रेल्वे वाहतूक सेवेमध्ये फ्लॉवर, ढोबळी मिरची, कोबी, शेवग्याच्या शेंगा, मिरची, कांदा अशा भाज्या तसेच द्राक्षे, संत्री, डाळिंब, केळी, सीताफळ इत्यादी फळे असतील. मार्गातील सर्व थांब्यांवर मालवाहतुकीच्या या रेल्वेच्या आकाराला कोणतेही बंधन न ठेवता नाशिवंत माल ट्रेन मध्ये भरणे आणि उतरवण्याला परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने फळ आणि भाज्यांच्या वाहतुकीवर 50 टक्के सवलत दिली आहे.
 
किसान रेल विषयी:
पहिली किसान रेल्वे 7 ऑगस्ट, 2020 रोजी देवळाली ते दानापूर पर्यंत चालवण्यात आली  आणि पुढे मुजफ्फरपूर पर्यंत हा प्रवास वाढविण्यात आला. शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने ही रेल्वे सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरु करण्यात आली.
देशभरात कृषी उत्पादनांची जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी किसान रेल्वेची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे. ही सेवा नाशिवंत उत्पादनांची अखंड पुरवठा साखळी प्रदान करते.

Web Title: Prime Minister Narendra Modi will show the green flag to the 100th Kisan Railway running from Sangola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.