शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांना उद‌्ध्वस्त केले : केशव उपाध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:20 IST

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाची निवडणूक शेतकरी हित व शेतकरी विरोधी अशी लढाई आहे. ठाकरे यांनी लॉकडाऊन शब्द ...

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाची निवडणूक शेतकरी हित व शेतकरी विरोधी अशी लढाई आहे. ठाकरे यांनी लॉकडाऊन शब्द उच्चारला अन् द्राक्षांचे भाव घसरले. ठाकरे सरकार शेतकऱ्यांना उद‌्ध्वस्त करण्याचे काम करत आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असूनही या सरकारने दीड वर्षात नवा पैसा दिला नाही, असे भाजपाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.

पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह निंबाळकर, माजी मंत्री बाळा भेगडे, आ. राहुल कुल, शंतनु दंडवते, बादलसिंह ठाकूर उपस्थित होते. पुढे उपाध्ये म्हणाले, खा. संजय राऊत यांनी पुन्हा राजकारण करू नये. गुजरात सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील कोरोना इंजेक्शन निर्यातीला बंदी घातली असती तर महाराष्ट्रात कोरोना इंजेक्शनचा तुटवडा पडला नसता. कोरोनाबाबत राजकारण थांबवावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. परंतु त्यांच्या पक्षातील खा. संजय राऊत यांनी पुन्हा राजकारण सुरू केले आहे. यामुळे ठाकरे यांनी प्रथम स्वतःच्या पक्षातील नेत्यांना आवरावे, असेही उपाध्ये यांनी सांगितले.

पवारांनी खालच्या पातळीचे बोलणे चुकीचे : निंबाळकर

पंढरपूर शहर जरी माझ्या मतदार संघात नसले तरीही मी अनेकवेळा पंढरपूर शहरातील प्रश्न मांडले आहेत. या पावन भूमीत उपमुख्यमंत्री अजित पवार खालच्या पातळीवर बोलून गेले आहेत. त्यांनी गल्लीबोळात जाऊन बॅगा पोच करायचं काम केले आहे. राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी असल्याची टीका खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी केली.

फडणवीस सोमवारी पंढरपूर, मंगळवेढ्यात

मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्र्वर, मंगळवेढा शहर व पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, गादेगाव, टिळक स्मारक (पंढरपूर शहर) येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सोमवारी होणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये, खा. रणजितसिंह निंबाळकर, माजी मंत्री बाळा भेगडे, आ. राहुल कुल आदी.