शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना

By admin | Updated: July 7, 2014 00:59 IST

अहले हदीस ईदगाह : मौलाना ताहेर बेग यांचे प्रवचन

सोलापूर : जून महिना संपला तरी पाऊस न आल्याने शहरातील मुस्लीम बांधवांनी रविवारी सकाळी पावसासाठी रंगभवन येथील अहले हदीस ईदगाह मैदानावर सकाळी ८ वाजता नमाज पठण केले. भरपूर पाऊस पडून समस्त मानव जातीमध्ये सुख, शांती, समाधान नांदू दे अशी प्रार्थना करण्यात आली. प्रेम, शांती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन यावेळी मौलाना ताहेर बेग यांनी आपल्या प्रवचनात केले. निसर्ग नियमाप्रमाणे जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. जून महिना संपला तरी पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात उजनी धरणातील पाणीपातळी वजा २० टक्क्यांवर गेल्याने भविष्यातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे आता पावसाची गरज निर्माण झाली आहे. यंदा चांगली पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी ईदगाह मैदानावर नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते. नमाज पठणापूर्वी बोलताना मौलाना ताहेर बेग म्हणाले की, पैसेवाले लोक जकात भरत नसतील, उद्योग-व्यवसायात सर्वसामान्य माणसाची फसवणूक करीत असतील तर या दोन कारणास्तव पाऊस होत नसतो. तसेच दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे, भ्रष्टाचार होत आहे. त्यासाठी अल्लाहकडे माफी मागून अपेक्षित कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. त्यावर ‘अल्लाह’ आपले गुन्हे माफ करतो आणि पाऊस पाडतो. माणसाची नीतिमत्ता बदलत आहे, त्याचा परिणाम समस्त मानव जातीवर होत असतो, त्यामुळे ‘अल्लाह’ च्या आदेशानुसार आचरण केल्यास सुख, शांती कायम ठेवून विकास साधण्यास वेळ लागत नाही. सर्वांनी एकत्र येवून एकमेकांप्रति स्नेहसंबंध, महिलांविषयी आदर बाळगण्याची गरज आहे, असे आवाहन यावेळी मौलाना ताहेर बेग यांनी केले. यावेळी मुख्तार अहमद हुमनाबादकर, माजी महापौर आरिफ शेख आदी मान्यवरही उपस्थित होते. ---------------------------अनेकांनी वाहिले अश्रू...नमाज पठणादरम्यान ‘अल्लाह’कडे एकरूप होऊन अनेक मुस्लीम बांधवांनी आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. भरपूर पाऊस होऊ दे, समस्त मानव जातीची भरभराट होऊ दे, सुख, शांती नांदू दे अशी प्रार्थना केली.