काँग्रेसकडून पुन्हा प्रणिती शिंदे, तर शिवसेनेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 05:52 AM2019-09-07T05:52:32+5:302019-09-07T05:52:35+5:30

शिवसेनेचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या बैठकीत या मतदारसंघातून दिलीप माने निवडणूक लढवतील असे जाहीर केले आहे

Praniti Shinde again from the Congress, same as the rope for the Shiv Sena candidate | काँग्रेसकडून पुन्हा प्रणिती शिंदे, तर शिवसेनेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच

काँग्रेसकडून पुन्हा प्रणिती शिंदे, तर शिवसेनेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच

Next

राजकुमार सारोळे

सोलापूर : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघ टिकविण्यासाठी यावेळेस मोठा संघर्ष करावा लागणार आहे. शिवसेना कोणाला उमेदवारी देणार यावरून या मतदारसंघातील लढत कशी होईल, हे ठरणार आहे.

आमदार शिंदे यांनी सलग दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मागील निवडणुकीत त्यांना चौरंगी लढतीत काट्याची टक्कर द्यावी लागली होती. यावेळेसही अशी परिस्थिती आहे. भाजप-सेना युतीवर त्यांचा संघर्ष अवलंबून आहे. युती झाली तर शिवसेनेच्या वाट्याला हा मतदारसंघ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळेस काँग्रेसमधून नाराज होऊन शिवसेनेत गेलेल्या महेश कोठे यांनी याच मतदारसंघातूनच निवडणूक लढविली. पण ते तिसऱ्या क्रमांकावर गेले. यावेळेस नुकतेच काँग्रेसमधून माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेनेचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या बैठकीत या मतदारसंघातून दिलीप माने निवडणूक लढवतील असे जाहीर केले आहे. त्यामुळे महेश कोठे यांची अडचण झाली आहे. त्याचबरोबर या मतदारसंघातून माकपचे माजी आमदार नरसय्या आडम आणि वंचित बहुजन आघाडी, एमआयएमची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू झाली आहे. युती झाली तर आमदार प्रणिती शिंदे यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे आमदार शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात ठाण मांडले आहे. घरोघरी जाऊन प्रत्येकांना भेटण्याचे तंत्र त्यांनी अवलंबले आहे. मतदारसंघात केलेली विकासकामे, लोकांच्या अडचणी सोडविण्यावर त्यांनी भर दिला आहे. तर मुलीच्या प्रेमाखातर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी या मतदारसंघासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

पाच वर्षांत काय घडले?
च्केंद्र सरकारच्या कायद्यामुळे विडी उद्योगावर संकट आले. कायद्यातील जाचक अटी रद्द करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलनाद्वारे संघर्ष केला.
च्माजी आमदार आडम मास्तर यांनी मोदी व फडणवीस सरकारच्या माध्यमातून अल्पसंख्याकांसाठी रे नगर गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून घरकूल योजना मार्गी लावली.
च्शिवसेना जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महेश कोठे यांनी या मतदारसंघात शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्याचा सपाटा सुरू ठेवला.
च्माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. दक्षिण सोलापूर हा त्यांचा मतदारसंघ असताना आता शिवसेनेत दाखल झाल्यावर त्यांची शहर मध्यची चर्चा सुरू आहे.

निवडणूक २०१४
प्रणिती शिंदे (काँग्रेस)
0४६९0७ मते
तौफिक शेख (एमआयएम)
०३७१३८ मते
महेश कोठे (शिवसेना)
०३३३३४ मते

संभाव्य प्रतिस्पर्धी
दिलीप माने (शिवसेना)
नरसय्या आडम (माकप)
पांडुरंग दिड्डी (भाजप)
तौफिक शेख (एमआयएम)

काँग्रेस, माकप वगळता इतर पक्षाचे उमेदवार अजून ठरलेले नाहीत. त्यामुळे अजून चित्र स्पष्ट होत नाही. पण लोकसभेपेक्षा वेगळे वातावरण निर्माण झाले आहे हे निश्चित. मागील लोकसभा व विधानसभेच्या परिस्थितीसारखे जो उमेदवार ताकद लावेल तो यशस्वी होईल असे वाटते.
- सुरेश फलमारी,
समाजसेवक

Web Title: Praniti Shinde again from the Congress, same as the rope for the Shiv Sena candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.