शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

मसाला दुधातून विषबाधा; सोलापुरातील विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:26 IST

पती-पत्नी फिरायला गेले अन् असं घडलं !

ठळक मुद्देभावना राजशेखर किणगी (वय २४, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) असे विषबाधा होऊन मरण पावलेल्या विवाहितेचे नावडॉक्टरांनी तपासल्यानंतर भावनाला अन्नातून विषबाधा झाली असल्याचे सांगितलेदुधातून विषबाधा झाल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले होते

सोलापूर : फिरायला बाहेर गेल्यानंतर मसाला दूध पिल्याने विषबाधा होऊन विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ७ वाजता घडला. या प्रकरणी संशय व्यक्त करीत विवाहितेच्या वडिलांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात केली आहे. 

भावना राजशेखर किणगी (वय २४, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) असे विषबाधा होऊन मरण पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. भावना किणगी ही पती राजशेखर किणगी यांच्यासोबत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बाहेर फिरायला गेली होती. दरम्यान, दोघांनी एका ठिकाणी मसाला दूध पिऊन घरी आले. घरी आल्यानंतर भावना किणगी हिला अचानक त्रास होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे पती राजशेखर किणगी यांनी भावनाला रात्री १0.३0 वाजता कन्ना चौकातील कृष्णा हॉस्पिटल येथे अ‍ॅडमिट केले. 

डॉक्टरांनी तपासल्यानंतर भावनाला अन्नातून विषबाधा झाली असल्याचे सांगितले. रात्री भावना शुद्धीवर आली, ती भाऊ गुरूशांतय्या हिरेमठ याला बोलली. पहाटे ५ वाजता गुरूशांत हिरेमठ हा सुनीलनगर येथील घरी आंघोळीसाठी गेला होता. मात्र ७.४५ वाजता दवाखान्यातून बहीण भावना हीचे निधन झाल्याचे फोन आला. गुरूशांतय्या यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली़ त्यांनी तत्काळ द्यावतंगी (ता. आळंद, जि. कलबुर्गी) येथील आपल्या आई-वडिलांना याची माहिती दिली. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. 

चौकशी करून न्याय द्या, पित्याने केली विनंती...- भावना हिचे लग्न अडीच वर्षांपूर्वी राजशेखर किणगी यांच्यासोबत झाले होते. घरामध्ये सासरा व हे दोघे पती-पत्नी राहतात. पहिले सहा महिने तिला चांगले नांदविण्यात आले, त्यानंतर पती-पत्नीमध्ये भांडणे झाली होती. समजावून सांंगितल्यानंतर राजशेखर यांनी नांदविण्याची तयारी दर्शवली होती. दुधातून विषबाधा झाल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले होते. पहाटे ५ वाजेपर्यंत ती चांगली होती, त्यानंतर अवघ्या दोन तासांत तिचे निधन झाले. विषबाधा झाल्याने तिचा मृत्यू झाला असून याची चौकशी करावी. खºया गुन्हेगाराचा शोध लागावा अशी लेखी तक्रार वडील शिवानंद मठपती यांनी केली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूmilkदूधSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस