शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणूकीची उमेदवारी जनतेच्या मनातील व्यक्तीलाच; भाजपाचे आमदारही संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 20:57 IST

आमदार रोहित पवार यांनी घेतले विठ्ठल दर्शन 

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या पोट निवडणूकीची उमेदवारी भालके यांना देण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांकडे शिफारस करणार का असा प्रश्न आ. रोहित पवार यांना  विचारला. त्यावर ते म्हणाले उमेदवारी देताना सर्वे करून लोकांच्या मनातील व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाईल, परंतु भाजपाचे आमदार व अन्य दोन नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे आ. रोहित पवार यांनी सांगितले.

रोहित पवार यांनी गुरुवारी सायंकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आमदार संजय शिंदे, सोलापूर महापालिकेचे नगरसेवक महेश कोठे, धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, संजय घोडके यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

पुढे पवार म्हणाले, विठ्ठल कारखाना व्यवस्थित चालण्यासाठी भालके यांना मदत करणार आहे, परंतु दिवंगत भारत भालके यांच्या जागेवर जनतेच्या मनातील उमेदवार दिला जाईल. तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच उमेदवारी निश्चित करणार आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेतील असे स्पष्ट केले. मात्र पोटनिवडणुकीतील उमेदवारी संदर्भात भाजपचे काही आजी-माजी आमदार देखील संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

वीज बिलाची ६५ हजार कोटी रुपये थकबाकी असून यामुळे राज्यावर आर्थिक ताण पडला आहे. अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याची इच्छा आहे परंतु आर्थिक संकट असल्यामुळे व केंद्र सरकार मदत करणार नसल्यामुळे याबाबत सवलत देणे शक्य नसल्याचे अप्रत्यक्ष पवार यांनी कबुली दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRohit Pawarरोहित पवारPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर