शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

सेतू चालकावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश

By admin | Updated: July 4, 2014 01:29 IST

दोन दलालांना अटक : जिल्हाधिकाऱ्यांची अचानक तपासणी

सोलापूर : सेतूमध्ये दलालांना प्रवेश देऊ नये तसेच सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र असणे बंधनकारक करा, असे सक्त आदेश देऊन देखील सेतू चालकाने याकडे दुर्लक्ष केले. यामुळेच सेतूमध्ये दलालांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले़ जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम हे सायंकाळी सहा वाजता सेतू कार्यालयात अचानक गेल्यावरही येथे दोन दलाल आढळले. त्यांच्यासह सेतू चालकांवरही गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे़ सेतू कार्यालयातील गर्दी आणि येथे दलालशाही यामुळे सोमवारी एका युवकास दलालाने जोरदार मारहाण केली होती़ त्यानंतर सेतूमधील कारभार सुधारेल, असे वाटले होते. मात्र पुन्हा दलालांचे काम जोमाने सुरू झाले़ महसूल खात्यातील काही कर्मचाऱ्यांचीदेखील त्यांना साथ आहे़ जिल्हाधिकारी सहा वाजता सेतू कार्यालयात गेल्यावर येथे अनेक गैरबाबी दिसल्या़ एक अपंग महिला आणि एका युवकास अटक करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले़ सय्यद नावाच्या दलालाकडे तब्बल १७ पावत्या आढळल्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले़ सेतू चालकाची यात चूक असल्यामुळे ठेकेदार पेस सिस्टम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांना दिले आहेत़ सेतूमध्ये चालकाने सुरक्षिततेसाठी कर्मचारी नेमणे, मोफत फॉर्म भरण्यासाठी सुविधा निर्माण करणे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्याचे करारपत्रात आहे; मात्र या अटी त्यांनी पाळल्या नाहीत, हे देखील टेंडर रद्द करण्याचे कारण असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले़ -----------------------------लवकरच नवीन सेतू चालकसध्याचा सेतू चालविण्याचा ठेका पेस सिस्टम यांना देण्यात आला असून विविध कारणास्तव त्यांचा ठेका रद्द करण्यात आला आहे़ मात्र त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे़ सेतूचा नवा ठेकेदार नेमण्यासाठी प्रसिद्धीकरण केले असून आयबीएम टेक्नॉलॉजी, जेएमके इन्फोटेक, गुजरात इन्फोटेक आणि सी शस्त्र या चार जणांच्या निविदा आल्या आहेत़ तांत्रिक तपासणी करून सेतू एजन्सी निश्चित केली जाईल; मात्र वर्क आॅर्डर न्यायालयाच्या निर्णयानंतर दिली जाणार आहे़---------------------------सेतूमध्ये कोणालाही जादा पैसे देऊ नयेत़ महसूल कर्मचाऱ्यांची जरी लिंक असेल तर त्यांच्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या ९५५२३३४५९९ या क्रमांकावर तक्रार करावी़ माझ्याकडेही तक्रार केली तरीही मी कारवाई करेऩ सेतू चालक दलालांना आत कसे येऊ देतो ?- डॉ. प्रवीण गेडामजिल्हाधिकारी