याबाबत वैराग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुहास जाधव हे शुक्रवारी दुपारी वडिलांसह शेतात दारे धरून शेताजवळच्या रोडकडेला असलेल्या बाभळीच्या झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले होते. यावेळी सुरेश जाधव हा दुचाकीवरून येऊन त्यांच्याजवळ थांबला. त्याने माझे भावास शिव्या का दिल्या? असे म्हणून शिवीगाळ करू लागला. यावेळी शिवीगाळ का करतो असे विचाले असता त्याने हातातील काठीने पाठीवर जोराने मुक्कामार देऊन जखमी केले. यावेळी जवळ असलेले वडील धनाजी जाधव त्याला का मारतो असे म्हणून सोडवण्यास आले. त्यांनाही त्याने ढकलून दिले आणि धमकी देऊन तो निघून गेला. याबाबत सुहास जाधव यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिली असून सुरेश धनाजी जाधव यांच्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}