शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

अपहार प्रकरणी अभियंत्यावर गुन्हा

By admin | Updated: May 23, 2014 00:55 IST

रस्त्याचे काम : ७२ लाखांचा अपहार

सोलापूर : २००९ ते २०११ या काळात अक्कलकोट, मोहोळ आणि दक्षिण सोलापूरसह इतर ठिकाणी कागदोपत्री रस्त्याचे काम केल्याचे दाखवून ७१ लाख ९७ हजार २३७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये कार्यकारी अभियंत्यांसह नऊ जणांविरुद्ध सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे़ कार्यकारी अभियंता आऱ एस़ बोबडे, उपअभियंता मुकर अंबादास उर्फ एम़ एस़ सूळ, उपअभियंता ए़सीक़दम, उपअभियंता व्ही़ वाय़ कोंडगुळे, अभियंता ए़जी़ आराध्ये, अभियंता बी़ जे़ दहिवडे, अभियंता डी़ एस़ पवार, शाखा अभियंता एस़ बी़ बशेट्टी, शाखा अभियंता एफ़ बी़ मुल्ला अशी अपहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या अधिकार्‍यांची नावे आहे़आरटीआय कार्यकर्ता सूर्यप्रकाश भीमाशंकर कोरे (वय ४५, रा़ शिंगडगाव, ता़ दक्षिण सोलापूर) यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवून हा प्रकार उघडकीस आणला़ १७ सप्टेंबर २००९ ते ३१ मार्च २०११ या काळात वरील अधिकारी येथील जिल्हा परिषदेत कार्यरत असताना जिल्ह्यात अक्कलकोट (म्हैसलगी, पानमंगरुळ, कुमठे), दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर अशा चार तालुक्यांमध्ये २० रस्त्यांची कामे काढण्यात आली़ प्रत्यक्षात रस्त्याची ही कामे न करता केवळ कागदोपत्री दाखवून ७१,९७,२३७ रुपयांचा अपहार केला़ माहितीच्या अधिकाराखाली कोरे यांनी पाठपुरावा केला आणि वेगळीच माहिती हाती आली़ त्यानंतर त्यांनी येथील न्यायालयात हे प्रकरण दाखल केले़ न्यायालयाने हे प्रकरण तपासून कार्यकारी अभियंत्यांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले़ याप्रकरणाचा तपास फौजदार कोळेकर करीत आहेत़