शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

४५ दिवस प्रवास करून एनटीपीसीचा टर्बाईन सोलापुरात

By admin | Updated: July 3, 2014 01:26 IST

२५० चाकी कंटेनर : २० दिवस पुणे नाक्याला थांबणार

 सोलापूर:अबब २५० चाकी कंटेनर, भिवंडीहून एनटीपीसीचा टर्बाईन घेऊन तब्बल ४५ दिवसांनी सोलापुरात पोहोचला. आता सोलापूर ते एनटीपीसी प्रकल्पापर्यंत हा टर्बाईन जाण्यासाठी २० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. फताटेवाडी येथील एनटीपीसी प्रकल्पासाठीचा पाणी व कोळशावर चालणारा अजस्त्र टर्बाईन (स्टॉर्टर जनरेटर) कोरियाहून मागविण्यात आला आहे. अल्ट्रस इंडिया या कंपनीने हे टर्बाईन बसविण्याचे काम घेतले आहे. हे टर्बाईन भिवंडीजवळील बंदरात उतरविण्यात आले होते. टर्बाईन आणण्याची जबाबदारी कार्गो लॉजिस्टिक ट्रान्स्पोर्ट कंपनीने उचलली आहे. साडेआठशे टन क्षमता असलेले दोन वॉल्व्हो इंजिन कंटेनरला जोडले आहेत. २५० चाकी असलेल्या या कंटेनरवर वेगळे तंत्रज्ञान वापरून अजस्त्र लोखंडी सांगड्यात अलगद टर्बाईन ठेवण्यात आले आहे. यामुळे कंटेनरची लांबी वाढली आहे. भिवंडी येथील बंदरातून ४५ दिवसांपूर्वी या कंटेनरचा प्रवास सुरू झाला. वाटेत चढण आल्यास अडचण होऊ नये म्हणून एक जादा इंजिन सोबत ठेवण्यात आले आहे. ३ चालक, २० कर्मचारी व चार अभियंत्यांची टीम या कंटेनरसोबत आहे. बोगदे व पूल चुकविण्यासाठी मोठा मार्ग या टीमला पार करावा लागला. पुणे शहराबाहेरून नाशिक, मालेगाव, शिर्डी, अहमदनगर, करमाळा, टेंभुर्णी, सोलापूर असा टीमला प्रवास करावा लागला. दररोज दिवसा २५ ते ५० किलोमीटरचा प्रवास होता. वाटेत वीजवाहक तारा, कमानी, टोलनाके पास करताना टीमला कसरत करावी लागली. कंटेनरमध्ये काय आहे याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती. बुधवारी दुपारी हा कंटेनर जुना पुणे नाका येथे पोहोचला. बसवंती पार्किंगमध्ये तो थांबविण्यात आला आहे. आता आहेरवाडी येथील एनटीपीसी प्रकल्पस्थळी टर्बाईन पोहोच करण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे लोखंडी सांगड्यातून टर्बाईन बाहेर काढून कंटेनरची रुंदी वाढविण्यात येणार आहे. यात दोन भागात असलेला कंटेनर जोडून, एक चाकाची लाईन वाढविण्यात येणार असल्याचे चालकाने सांगितले. हे काम करण्यासाठी आठवडा लागेल व त्यासाठी मोठे क्रेन लागणार आहेत.-----------------------१५ दिवस जागेचा शोधया कंटेनरला थांबविण्यासाठी १५ दिवस जागेचा शोध सुरू होता. जुना पुणे नाक्याजवळ वीरभद्रेश बसवंती यांनी सुरू केलेल्या पार्किंगची जागा निवडण्यात आली. तशी त्यांना कल्पना देऊन बुधवारी दुपारी कंटेनर पोहचला. पुढील मार्गाची पाहणी टीमने केली. होटगी नाका चौकातील अडचण लक्षात घेऊन अक्कलकोट रस्ता, कुंभारी, सिद्धेश्वर साखर कारखानामार्गे नेण्याचे ठरविण्यात आले.