शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मंुबईचे आरोग्य पथक पंढरपुरात मठ्ठा व दहीतून विषबाधा; अन्नसुरक्षा पथक रवाना

By admin | Updated: May 9, 2014 23:50 IST

पंढरपूर :

पंढरपूर : आंबे (ता. पंढरपूर) येथील दर्लिंग देवाच्या वालगा प्रसादातून झालेल्या विषबाधेचे कारण तपासणीसाठी संचालक आरोग्य सेवा पथकाने आंबे गावात व पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना भेट दिली.आरोग्य विभागाचे पाच जणांचे पथक पंढरपूर येथे शुक्रवारी दाखल झाले. या पथकामध्ये डॉ. आवटे, डॉ. वाघमारे, डॉ. राजहंस व आणखी दोन डॉक्टरांचा समावेश होता. या पथकाने विषबाधा झाल्यानंतर ताप आला म्हणून उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले. त्याचबरोबर आचारी व त्याला मदत करणार्‍या लोकांच्या शौचाचे नमुने घेऊन तपासणी केली. या नमुन्याच्या तपासणीसाठी पथकाने प्रयोगशाळा साहित्य त्यांच्याबरोबर आणले होते. या तपासणीवरुन विषबाधा कोणत्या जीवाणूंमुळे झाली असावी याचे नेमके कारण कळणार आहे. त्यांच्याकडून ही विषबाधा मठ्ठा व दहीतून झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात होता.त्याचबरोबर अन्न व औषध विभागाच्या अधिकार्‍यांनी राजाराम पुजारी यांनी जेवणाचे साहित्य कोणत्या ठिकाणावरुन आणले याची चौकशी केली असता त्यांनी मी आणले नसून मुलाने आणले आहे असे उत्तर दिले. यामुळे त्यांच्या मुलाकडे कोणत्या दुकानातून साहित्य खरेदी केले होते याची चौकशी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या तीन लोकांचे पथक आंबे (ता. पंढरपूर) येथे रवाना केले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त टी. सी. बोरावके यांनी दिली.मठ्ठा व दहीचे नमुने मिळाले नाहीउन्हाळ्याचे दिवस असल्याने तयार करण्यात आलेल्या मठ्ठातून विषबाधा होण्याची शक्यता अधिकार्‍यांनी वर्तविली. मात्र मठ्ठा व दहीचे नमुने मिळाले नसल्याने यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचे नमुने त्यांनी घेतले. या सर्व नमुन्याच्या तपासणीचा अहवाल लवकर द्या, अशा मागणीचे पत्र राज्य आरोग्य प्रयोगशाळेला दिले असल्याची माहिती सोलापूर विभागाचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त टी. सी. बोरावके यांनी दिली.बारा रुग्णांची वाढआंबे (ता. पंढरपूर) येथील आणखी बारा विषबाधेचे रुग्ण शुक्रवारी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. पूर्वी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४२ रुग्णांची प्रकृती ठीक असल्याची माहिती उपजिल्हा अधीक्षक पंकज गायकवाड यांनी दिली.रुग्णांना नेत्यांची भेटआंबे (ता. पंढरपूर) येथील विषबाधा झालेल्या रुग्णांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, प्रणव परिचारक, भाऊसाहेब जगताप, सुधाकर बंदप˜े तर रिपाइंचे नेते आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, संतोष पवार यांनी भेट दिली.