साखरपेठेत पैशासाठी मुलाने आईला बदडले

By Admin | Updated: June 10, 2014 01:01 IST2014-06-10T01:01:41+5:302014-06-10T01:01:41+5:30

आईला बेदम मारहाण केल्याची घटना साखरपेठेतील हॉटेल सुरभीलगत घडली. मुलाच्या मारहाणीत आई कमला यादगिरी वेगल्लम (वय ४५) ही गंभीर जखमी झाली.

For the money, the child has lost his mother for money | साखरपेठेत पैशासाठी मुलाने आईला बदडले

साखरपेठेत पैशासाठी मुलाने आईला बदडले


सोलापूर : पैशासाठी कोण कधी काय करेल याचा नेम नाही. पैसा हाच सर्वस्व मानणाऱ्या मुलाने आईला बेदम मारहाण केल्याची घटना साखरपेठेतील हॉटेल सुरभीलगत घडली. मुलाच्या मारहाणीत आई कमला यादगिरी वेगल्लम (वय ४५) ही गंभीर जखमी झाली.
कमला ही विड्या वळण्याचे काम करते. मिळालेल्या मजुरीवरच तिचा कसाबसा संसार सुरू आहे. असे असताना रविवारी दुपारी १ वाजता मुलगा राजू यादगिरी वेगल्लम हा घरी आला. घरी येताच त्याने आईकडे दीड हजार रुपयांची मागणी केली. माझ्याजवळ सध्या पैसे नाहीत, असे म्हणताच चिडलेल्या मुलाने घरातील कपाट फोडून भांडी भिरकावून दिल्या. त्याचवेळी कमला ही स्वयंपाक खोलीतील गॅस बंद करीत असताना राजूने तिच्या डोक्यावर, गुडघ्यावर, मांडीवर बॅटने, दगडाने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या कमला हिला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.
कमला हिने जेलरोड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली असून, राजू वेगल्लम याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस नाईक माने करीत आहेत.

Web Title: For the money, the child has lost his mother for money