शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

आधुनिक नवदुर्गा ; प्रतिकूल परिस्थितीत फळे विकून मुलाला बनविले पोलीस उपनिरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:59 AM

विजय विजापुरे / शंभूलिंग आकतनाळ। चपळगाव : प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करताना अनेक वेळा हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मात्र एखादी गोष्ट ठरविली तर ठाम ध्येयाने पुढे जाता येते, याचे उदाहरण बºहाणपूर (ता. अक्कलकोट) येथील ताहेराबी मकानदार या महिलेने दाखवून दिले आहे. आपल्या मुलाला पोलीस उपनिरीक्षक बनविणाºया ताहेराबी या ...

ठळक मुद्दे मुलाला पोलीस उपनिरीक्षक बनविणाºया ताहेराबी या नवदुर्गेची कहाणी लग्न झाल्यापासून डोक्यावर घेतलेली टोपली अखंड ठेवून त्यांनी आपला मुलगा महिबूब याला शिक्षण व संस्कार दिले

विजय विजापुरे / शंभूलिंग आकतनाळ। 

चपळगाव : प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करताना अनेक वेळा हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मात्र एखादी गोष्ट ठरविली तर ठाम ध्येयाने पुढे जाता येते, याचे उदाहरण बºहाणपूर (ता. अक्कलकोट) येथील ताहेराबी मकानदार या महिलेने दाखवून दिले आहे. आपल्या मुलाला पोलीस उपनिरीक्षक बनविणाºया ताहेराबी या नवदुर्गेची कहाणी तितकीच संघर्षमय आहे.

ताहेराबी हुसेनशा मकानदार या सबंध पंचक्रोशीत डोक्यावर टोपली घेऊन बोरे, जांभूळ, आंबे व इतर फळे विकून संसाराचा गाडा चालवितात. आपल्या पतीसोबत मिळेल ते काम करतात. या कुटुंबात आजतागायत कोणीही सरकारी नोकरीत नाही. आपल्या मुलाने सरकारी नोकरी करावी, ही ताहेराबी यांची अपेक्षा. लग्न झाल्यापासून डोक्यावर घेतलेली टोपली अखंड ठेवून त्यांनी आपला मुलगा महिबूब याला शिक्षण व संस्कार दिले. याच आधारे महिबूब ठाण्यात नोकरी करतो. त्यांचा दुसरा मुलगाही भरतीपूर्व प्रशिक्षण घेतो आहे.ताहेराबी मकानदार यांचे घर छपराचे होते.

पावसाळ्यात पडलेल्या पावसाने पाणी घरात पडायचे. अशा कठीण प्रसंगी महिबूब छोट्या भांडीने पाणी काढायचा, पण परिस्थितीवर तो कधीच रुसला नाही, ही गोष्ट सांगताना ताहेराबींना अश्रू आवरणे कठीण झाले. आज माझा छपरातील मुलगा पीएसआय झालाय, हा अभिमान मात्र त्यांच्या चेहºयावर दिसला. आपल्या संपूर्ण आयुष्यात ताहेराबी यांनी आपल्या मुलांना कधीच कामावर पाठवले नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य.

प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे महिलेचा हात असतो, हेच ताहेराबींनी जाणले. तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणाहून आणलेली फळे विकून संसाराचा गाडा चालविला. आधुनिक युगात एकत्र कुटुंबपद्धती संपत चालली असतानाही १५ जणांचे कुटुंब अबाधित ठेवण्यात ताहेराबींचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे आहे. त्या बचत गटातही काम करतात. अल्पदरात अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना भात शिजवून एकप्रकारे समाजसेवेचे व्रत यांनी दाखवून दिले आहे. 

 स्व. गुडनशा हे ताहेराबींचे सासरे. समाजसेवक म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्यभर अन्नदान व इतरांना मदत करण्याची भावना जोपासली होती. प्रतिकूल परिस्थितीत आजदेखील हा वारसा पुढे नेत ताहेराबी व मकानदार कुटुंब हे समाजातील लोकांसाठी विविध प्रकारे मदत करतात, हे विशेष! कुटुंब आणि मुलांच्या जडणघडणीत ताहेराबींनी कोणाकडूनही आर्थिक मदत घेतली नाही. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा एक रुपयाही नाही. महिबूबच्या जडणघडणीत हैदरशा मकानदार (काका), साहेरा मकानदार (काकू) यांच्यासह परिवारातील सदस्यांचादेखील हातभार आहे. 

- घरात कोणीच सरकारी नोकर झाले नाही, ही खंत मनात ठेवून आपल्या मुलाला सरकारी नोकरी असावी या उद्देशाने ताहेराबी मकानदार यांनी डोक्यावर घेतलेली फळांची टोपली कायम राखली. आपला मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाला याचा आनंद त्यांच्या चेहºयावर दिसतो. मुलांना कोणतेही कष्ट करावे लागू नये म्हणून स्वत:च त्या कार्यरत राहिल्या.

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्री