मिस्त्रीने केला पत्नीचा खून

By Admin | Updated: June 21, 2014 01:10 IST2014-06-21T01:10:53+5:302014-06-21T01:10:53+5:30

विवाहितेचा खून

Mistry's wife murdered | मिस्त्रीने केला पत्नीचा खून

मिस्त्रीने केला पत्नीचा खून


सोलापूर : देगाव येथील डफळेनगर येथील ‘त्या’ विवाहितेचा खून केल्याप्रकरणी पतीविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रल्हाद शंकर निकंबे (वय ६४, रा. भारतमाता शाळेजवळ सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावई अविनाश अंबादास गायकवाड (रा. देगाव) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ जून २०११ रोजी त्यांची मुलगी रेखा हिचे आरोपी अविनाश याच्याबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर तीन महिने त्याने तिला व्यवस्थित नांदविले. त्यानंतर दारू पिऊन तो तिला मारहाण करू लागला. तीन महिन्यांपासून सेंट्रिंगच्या कामासाठी माहेरून एक लाख रुपये आण म्हणून तो भांडण करू लागला. याच कारणावरून भांडण उकरून त्याने १८ जून रोजी सकाळी १० वाजता तिला अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. आग विझविताना तोही भाजला. शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केल्यावर स्टोव्हच्या भडक्याने ती पेटली असल्याचे त्याने सांगितले. उपचार सुरू असताना सायंकाळी ती मरण पावली.

Web Title: Mistry's wife murdered