वैद्यकीय बिले पेंडिंग ठेवणारा लिपिक निलंबित

By Admin | Updated: June 27, 2014 01:10 IST2014-06-27T01:10:45+5:302014-06-27T01:10:45+5:30

शिक्षण विभाग: गुडेवार यांची शेवटची सही

Medical bills pending suspension clerk | वैद्यकीय बिले पेंडिंग ठेवणारा लिपिक निलंबित

वैद्यकीय बिले पेंडिंग ठेवणारा लिपिक निलंबित


सोलापूर: वैद्यकीय बिले पेंडिंग ठेवणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागातील ए. ए. म्हेत्रे या लिपिकाला जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ चंद्रकांत गुडेवार यांनी निलंबित केले आहे.
१२ जून रोजी पदभार घेतल्यानंतर गुडेवार यांनी फायली काढण्याचा धडाका लावला होता. प्राथमिक शिक्षकांची वैद्यकीय बिले पेंडिंग असल्याचे लक्षात आले होते.
बिले पेंडिंग ठेवल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हेत्रे यांना नोटीसही दिली होती. तरीही पेंडिंग बिले काही केल्या निघत नसल्याने त्यांचा टेबल संतोष नीळ यांच्याकडे देण्यात आला होता. नीळ यांनी दीड महिन्यात तयार केलेल्या २५ बिलाला समितीचे मान्यता दिली आहे. २१ बिले तयार असून मंजुरीसाठी तयार आहेत. अन्य बिले तयार करण्यासाठी त्रुटी आहेत.
म्हेत्रे यांच्याकडे आलेल्या बिलाची प्रकरणेच गहाळ झाली तर अनेक प्रकरणाच्या टिप्पणी गायब झाल्या असल्याचे तपासणीत दिसून आले. यामुळे प्रभारी सीईओ गुडेवार यांनी म्हेत्रे यांना निलंबित केले. --------------------
झटक्यात फाईल मार्गी
प्रभारी सीईओ चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्यानंतर सोमवारपासून ते तीन दिवस पुण्याला गेले होते. गुरुवारी सकाळी त्यांनी त्यांच्या मनपाच्या निवासस्थानी काही मिनिटात किमान ५० फायलींवर सह्या केल्या. फायली घेऊन गेलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी अनेक फायलींची आठवण करुन दिली.

Web Title: Medical bills pending suspension clerk