‘लोकमत बांधावर’; सडलेला कांदा बघायची आली वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 03:01 PM2019-11-06T15:01:07+5:302019-11-06T15:05:13+5:30

उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांचे नुकसार; रानमसलेतील शेतकºयांच्या डोळ्यात पाणीच पाणी...

'On Lokmat Bandh'; Time to look at the rotten onion | ‘लोकमत बांधावर’; सडलेला कांदा बघायची आली वेळ

‘लोकमत बांधावर’; सडलेला कांदा बघायची आली वेळ

Next
ठळक मुद्दे- परतीच्या पावसाने उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांचे नुकसान-  प्रशासनाकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू- शेतकºयांना त्वरीत भरपाई देण्याची शेतकºयांची प्रशासनाकडे मागणी

अरुण बारसकर 

सोलापूर: टँकरच्या पाण्याने रोप जोपासले, तुटपुंज्या पाण्यावर कांद्याची लागवड केली, कधी रिमझिम तर कधी जोराचा पाऊस पडल्याने कांदा पीक जोमात आले.  अन् आॅक्टोबरमध्ये महिनाभर पावसाची संततधार सुरू झाली. आता रानमसलेकरांना डोळ्यात पाणी आणून सडलेला कांदा पाहण्याची वेळ आली आहे.

रानमसले गावात प्रामुख्याने कांदा व ज्वारी हीच पिके घेतली जातात.  यंदाही अकराशेहून अधिक एकरावर कांदा लागवड झाली आहे. कांद्याचे गाव अशी ओळख असलेल्या गावातील अतुल गरड, पांडुरंग शिंदे, सोन्याबापू गरड, नागनाथ चव्हाण, शहाजी गरड, शिवाजी करंडे, हणुमंत गरड या शेतकºयांच्या कांद्याचे पीक पाहिले असता पावसाचे परिणाम काय असू शकतात, हे लक्षात येते. 

गावाची एकही दिशा अशी नाही की तेथे कांदा दिसत नाही.  मात्र यावर्षी संपूर्ण आॅक्टोबर महिन्यात पाऊस पडत राहिल्याने कांदा पाण्यातच नासू लागल्याचे पाहण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

पंचनामे अन् धो..धो पाऊस
- सोमवारी रानमसले गावात तलाठी एस.ए. गवळी,  कृषी सहायक सुवर्णा नरगिरे हे बांधावर जाऊन कांदा नुकसानीचे पंचानामे करीत होते. त्यातच दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू झाला. नको..नको.. म्हणण्याची वेळ आली असताना सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा पंचनाम्याला व्यत्यय आला. मात्र रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे पंचनामे अंधार पडेपर्यंत कर्मचाºयांनी केले. 

 

Web Title: 'On Lokmat Bandh'; Time to look at the rotten onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.