शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पराभवातून खूप काही शिकलो

By admin | Updated: May 31, 2014 13:11 IST

लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य असून, पराभवातून आम्ही खूप काही शिकलो.

सांगोला : लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य असून, पराभवातून आम्ही खूप काही शिकलो. निवडणुकीत यश-अपयश येतच असते, म्हणून निवडून आलेल्या सरकारने हुरळून जाऊ नये, असे सांगून आम्ही अपयश आले म्हणून खचून जाणार नाही. या निवडणुकीत जनतेने स्थैर्याच्या बाजूने कौल दिला. आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी करून लढविणार असल्याचे सूतोवाच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. खासगी दौर्‍यानिमित्त सांगोल्यात आले असता ते बोलत होते. काँग्रेस व आम्ही यापूर्वी १९७७ व १९९५ साली पराभव पाहिला आहे. १९७७ नंतर दोन वर्षांतच जनतेने परत आम्हाला संधी दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधात जनतेने कौल देताना देशाच्या स्थैर्यासाठी भाजपाला साथ दिली. मात्र तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश व ओडिशा येथे मात्र जनतेने सक्षम पर्याय म्हणून राज्यातील घटक पक्षास मतदान केल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले. आगामी विधानसभेच्या निवडणुका एकत्रितच लढविणार असून कोणाला किती जागा याविषयी अद्याप निर्णय झाला नाही. देशात जनतेने स्थौर्याला संधी दिली आहे. एखादी विचारधारा किंंवा लाटेचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले. स्मृती इराणी अन् काँग्रेसला सल्ला लोकांचा आदर करणे, पराभवाची कारणेमीमांसा शोधून पुन्हा आत्मविश्वासाने कामाला लागणे गरजेचे आहे. नव्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक मुद्द्यावरुन काँग्रेसने विनाकारण वादात पडू नये. संबंधित मंत्र्याची अगोदर कामगिरी पहावी आणि मगच त्या विषयावर आपले मत प्रकट करावे, असे म्हणत पवारांनी काँग्रेसला सल्ला दिला. यावेळी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. भारत भालके, मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, आ. बबनराव शिंंदे, आ. दीपक साळुंखे, माजी आ. सुधाकरपंत परिचारक उपस्थित होते.

--------------------------------

मोदींचे कौतुक ४पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १२ वर्षे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिल्याने त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे मला वाटत नाही की, देशाची सूत्रे हलविताना अडचण येणार आहे, असे म्हणत त्यांनी मोदींचे कौतुकच केले.