शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

World Senior Citizens Day; नरकातून बाहेर पडलेल्या वृद्धांनी निर्माण केला स्वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 1:10 PM

ज्येष्ठ नागरिक दिन; प्रेम, आपुलकीच्या जोरावर बनल्या एकमेकींच्या सहृदयी

सोलापूर : आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याला साथ कोणी देईल की नाही याची चिंता जन्मभर सतावते आणि शेवटच्या टप्प्यात स्वकीयांनी लांब केल्यानंतर माणसाची जी अवस्था होते ती नरकाहून वेगळी नसते. कौटुंबिक नरक अनुभवलेल्या वृद्ध महिला येथील एका आश्रमात एकमेकींच्या सहृदयी बनत वृद्धाश्रमाचा स्वर्ग केला. हाच स्वर्ग आता सोलापुरातील अनेक सामाजिक संस्थांचा प्रेरणास्रोत बनला आहे. 

येथील मंगलदृष्टी वृद्धाश्रमात भेटी देणाºया सामाजिक संस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढदिवस, विवाह दिन तसेच इतर जयंती दिवशी विविध सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल आश्रमात चालते. एक आॅक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन आहे. डफरीन चौकनजीक बीसी गर्ल्स हॉस्टेलच्या जुन्या इमारतीत मंगलदृष्टी वृद्धाश्रम आहे. सध्या या आश्रमात बारा वृद्ध महिला आहेत. विविध ठिकाणांहून आलेल्या वृद्ध महिला अत्यंत गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. आपुलकीने एकमेकांची काळजी घेतात. 

आश्रमकडून या सर्व महिलांची काळजी घेतली जाते. रोज दोन वेळचं जेवण आणि सकाळी नाष्टा दिला जातो. यासोबत आरोग्याची काळजी घेतली जाते. आजारी महिलांची तपासणी वारंवार होते. या कामात आश्रमाचे प्रमुख सतीश मालू, माजी नगरसेविका चंद्रिका चौहान व रोटरी क्लब तसेच रोटी बँकेकडून भरपूर सहकार्य मिळते. 

दवाखान्यात असतानाही मुलं आली नाहीतआश्रमाच्या व्यवस्थापिका रजनी भाटिया सांगतात, एक आजी खूप सिरीयस होती. तिला दवाखान्यात अ‍ॅडमिट केलं. तिच्या मुलांना आणि नातेवाईकांना ती भेटू इच्छित होती. याची कल्पना तिच्या नातेवाईकांना दिली. अनेकदा फोन करून भेटायला येण्याची विनंती केली. तिच्या नातेवाईकांनी तिला नाकारलं. पुन्हा फोन करू नका, असंही धमकावलं. त्यामुळे त्या आजीची शेवटची इच्छा अपूर्ण राहिली. पण, तिला तिच्या शेवटच्या काळात आश्रममधील महिलांनीच जपलं, प्रेम दिलं. आपुलकीनं वागविलं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आश्रममधीलच महिला एकमेकींच्या सहृदयी बनतात. यातूनच स्वर्ग निर्माण झाल्याचा आनंद सर्वांना मिळतो. 

टॅग्स :SolapurसोलापूरSenior Citizenज्येष्ठ नागरिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य