शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिक हाकणार धोत्रे ग्रामपंचायतीचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:11 IST

बार्शी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे़ नेत्यांनी केलेल्या बिनविरोधच्या आवाहनाला ...

बार्शी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे़ नेत्यांनी केलेल्या बिनविरोधच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक पातळ्यावर गटा-गटांमध्ये मनोमिलन झाले. अन्‌ तालुक्यातील १६ गावच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत़ यामध्ये धोत्रे ग्रामपंचायतीची निवडणूक प्रथमच बिनविरोध झाली. त्यातही देशसेवा केलेल्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या ‘सौ.’ गावचा कारभार हाकण्यासाठी संधी दिली गेली.

धोत्रे हे बार्शीपासून १२ किलोमीटरवर असणारं छोटेसं २ हजार लोकसंख्येचे गाव़ गावात सर्व जाती-धर्माची घरे आहेत़ आजवर येथे पक्षीय राजकारण चालायचे़ त्यामुळे गट-तट आलेच़ यामुळे आजवर निवडणूक कधी बिनविरोध झाली नाही़ गावात तीन प्रभाग असून, नऊ ग्रामपंचायत सदस्य आहेत़ तर १,३१३ एवढे मतदान आहे़ इथल्या नागरिकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय. नोकरदारांची संख्याही बऱ्यापैकी आहे़ मध्यमवयस्क व वयोवृध्द असे ३४ माजी सैनिक आहेत़ तर १५ सैनिक सध्या ऑनड्युटी आहेत़

यंदा ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्यानंतर आजवर देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी आजवर आम्ही देशसेवा केली आहे़ त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सर्व गावकऱ्यांनी आम्हाला बिनविरोध निवडून देऊन गावाची सेवा करण्याची संधी द्यावी, अशी इच्छा बोलून दाखवली़ त्यानुसार गावकऱ्यांनी तयारी पण दाखवली़ मात्र १७ उमेदवारी अर्ज दाखल दाखल झाले आहे़ या सर्व माजी सैनिकांनी आम्हाला सर्व जागा बिनविरोध द्या़ एखाद्याने जरी अर्ज ठेवलाच तर आम्ही सर्व जण माघार घेणार अशी भूमिका जाहीर केली होती़ त्यानुसार मंगळवारी माजी सैनिक सोडून इतर सर्व आठ जणांनी अर्ज माघारी घेतल्याने सर्व नऊ सदस्य अविरोध निवडून आले़

-----बिनविरोध अन्‌ माघार घेतलेल्यांचा सन्मान---

मंगळवारी सकाळी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत बिनविरोध निवडून आलेल्यांचाच नव्हे तर ज्यांनी अर्ज माघारी घेऊन मनाचा मोठेपणा दाखवला. सैनिकांप्रती आदर व्यक्त केला. त्या आठ जणांचाही सन्मान करण्यात आला.

हे आहेत बिनविरोध निवडलेले सदस्य

सचिन शहाजी लांडे, शालन चंद्रकांत घोडके, नंदा दत्तात्रय सुरवसे, सुमन प्रभू जाधवर, गणेश मालोजी मोरे, उल्लतबी जमादार शेख, वंदना मोहन जाधवर, मंगल सुरेश जाधवर, बुवासाहेब रामचंद्र बोकेफोडे या सर्व माजी सैनिक व माजी सैनिकांच्या पत्नीचा बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये समावेश आहे़

------