उंबर्गेत दारूच्या नशेत वृद्धाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:13 IST2021-01-08T05:13:01+5:302021-01-08T05:13:01+5:30

अनिकेत अंकुश लष्कर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, ६ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता जेवण करून आजोबा-आजी घरासमोरच्या ...

Drunk old man commits suicide in Umberg | उंबर्गेत दारूच्या नशेत वृद्धाची आत्महत्या

उंबर्गेत दारूच्या नशेत वृद्धाची आत्महत्या

अनिकेत अंकुश लष्कर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, ६ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता जेवण करून आजोबा-आजी घरासमोरच्या गोठ्याकडे झोपण्यासाठी गेले होते. मी मिस्त्री काम करतो व आजोबा दगडी काम करत होते, परंतु गेल्या १० महिन्यांपासून काम पूर्ण बंद आहे. आता थोडेफार काम सुरू झाले. दगडी काम बंद असून शेतमजुरीचे काम मिळत नाही व त्यांना तीन मुले होती, तिन्ही मुले मयत झाल्याने ते नातू अनिकेत अंकुश लष्कर यांच्याकडे ते होते.ते अधूनमधून दारू प्यायचे, परंतु आता आपणास काम होऊ होत नाही. शेतमजुरीचे काम मिळत नाही, त्यामुळेच त्यांनी दारू नशेत गोठ्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. पुढील तपास हवालदार राजेंद्र मंगरुळे हे करीत आहेत.

फोटो

०७भगवान लष्कर

Web Title: Drunk old man commits suicide in Umberg