सोलापूर : गीतानगरमध्ये डॉ़ प्रमोद व्यंकट माने यांचे घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी रोकडसह १ लाख ५३ हजार रुपयांचे ७ तोळे दागिने पळविल्याची घटना गुरुवारी घडली़ या घटनेनंतर जेलरोड पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली, मात्र श्वान पथकाची मदत घेऊनही गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळू शकले नाही़ डॉ़ प्रमोद माने हे न्यू पाच्छा पेठ परिसरात गीतानगरमध्ये राघवेंद्र एक्स्लन्सीमध्ये राहतात़ गुरुवारी दुपारी त्यांच्या घरी कोणीच नव्हते़ त्यांचे स्वत:चे रुग्णालय असून आज दुपारी ते रुग्णालयात होते़ दुपारी १२़३० वाजता ते घर बंद करुन रुग्णालयात आले़ त्यानंतर दुपारी दीड वाजता ते घरी परतले असता चोरट्यांनी घर फोडून हात साफ करुन घेतल्याचे लक्षात आले़ दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि लोखंडी कपाट उचकटले़ चोरट्यांनी ४ तोळ्याचे गंठण, एक तोळ्याचे नेकलेस, अर्धा तोळ्याची अंगठी, अर्धा तोळे कर्णफुले, अर्धा तोळ्याची चेन, अर्धा तोळे सोन्याचे लॉकेट आणि रोख ३ हजार रुपये असा १ लाख ५३ हजारांचा ऐवज पळविला़ ही घटना लक्षात येताच डॉ़ माने यांनी तत्काळ जेलरोड पोलीस ठाणे गाठले़ पोलिसांनी घटनास्थळी ठसेतज्ज्ञ आणि श्वानाला पाचारण केले़ परंतु श्वान घरापासून थोड्या अंतरावर जाऊन घुटमळत राहिले़ तसेच ठसेतज्ज्ञांना तीन ठिकाणी ठसे प्राप्त झाले असून तपास फौजदार जाधव करीत आहेत़
गीतानगरमध्ये डॉक्टराचे घर फोडले
By admin | Updated: July 4, 2014 01:33 IST
भरदिवसा घडला प्रकार : सात तोळे दागिने लंपास
गीतानगरमध्ये डॉक्टराचे घर फोडले
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}