शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरने दोन चोरट्यांना पकडले

By admin | Updated: May 23, 2014 01:12 IST

सांगोला : पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेला लुटणार्‍या दोन चोरट्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरने पाठलाग करुन पकडले. ही घटना गुरुवारी दुपारी पारे येथील तलावाजवळ घडली.

सांगोला : पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेला लुटणार्‍या दोन चोरट्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरने पाठलाग करुन पकडले. ही घटना गुरुवारी दुपारी पारे येथील तलावाजवळ घडली. रखबाई संदिपान यमगर (वय ६५, रा. घेरडी, यमगरवाडी, ता. सांगोला) असे वृद्ध महिलेचे नाव असून सुभाष उर्फ लक्ष्मण मारुती पवार (वय २०) व विशाल उर्फ बाबा इराप्पा पवार (वय १८ दोघेही रा. जत, विठ्ठलनगर, जि. सांगली) असे त्या दोन चोरट्यांची नावे आहेत. यमगरवाडी येथील रखबाई संदिपान यमगर ही वृद्ध महिला गुरुवारी सकाळी शेतीच्या कामानिमित्त घेरडी तलाठी कार्यालयात आल्या होत्या. दु. १२.३० वा. काम संपवून सांगोला-नराळे बसने घराकडे निघाल्या होत्या. बस यमगरवाडी स्थानकावर आल्यानंतर त्या एकट्याच बसमधून उतरुन घराकडे पायी चालल्या होत्या. दरम्यान, अचानक (क्र. एम. एच. १०/ ए. जे. ९७१) पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी रमेश चौगुले यांचा पत्ता विचारण्याचा बहाणा करीत वृद्ध महिलेस रोखले. चाकूचा धाक धाकविण्याबरोबरच तिला जखमी करून तिच्या गळ्यातील बोरमाळ घेऊन पोबारा केला. यादरम्यान पारे गावाकडून दुचाकीवरुन डॉ. उमाजी हणुमंत पुकळे हे घेरडीकडे येत असताना वृद्ध महिला आरडाओरड करीत दुचाकीच्या पाठीमागे धावत असल्याचे पाहिले. डॉ. पुकळे यांनी दुचाकी थांबवून त्या महिलेस काय झाले आहे, असे विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुचाकीसह दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. रखबाई संदिपान यमगर यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे. तपास पो. नि. दयानंद गावडे करीत आहेत.

---------------------

असे पकडले चोरट्यांना ४डॉ. पुकळे यांनी समयसूचकता दाखवत जत रोडवरुन दुचाकीचा ४ कि. मी. पाठलाग केला. पारे तलावाजवळील धोकादायक वळणावर चोरट्यांची दुचाकी घसरल्याने वेग कमी झाला. यावेळी डॉ. पुकळे यांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने दोन्ही चोरट्यांना जेरबंद केले.