शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दलालांना हाताशी धरून पाच टन बियाणांची विक्री बियाणे वाटपात गैरव्यवहार; दोषींवर कारवाईची मागणी

By admin | Updated: May 9, 2014 23:45 IST

सांगोला : रब्बी हंगामासाठी सांगोला तालुक्यात कृषी विभागातर्फे मोफत वितरित करावयाच्या गहू बियाणे वाटपात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला असून, कृषी कर्मचार्‍यांनी ठराविक दलालांना हाताशी धरून सुमारे पाच टन बियाणे खाजगीत विकले असल्याची तक्रार गायगव्हाण (ता. सांगोला) येथील शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सांगोला : रब्बी हंगामासाठी सांगोला तालुक्यात कृषी विभागातर्फे मोफत वितरित करावयाच्या गहू बियाणे वाटपात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला असून, कृषी कर्मचार्‍यांनी ठराविक दलालांना हाताशी धरून सुमारे पाच टन बियाणे खाजगीत विकले असल्याची तक्रार गायगव्हाण (ता. सांगोला) येथील शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रब्बी हंगामासाठी हेक्टरी एक क्विंटलप्रमाणे गहू बियाणे मोफत वितरित करण्यासाठी सुमारे पाच टन बियाणे कृषी कार्यालयास प्राप्त झाले होते. मोफत गहू बियाणे वाटपासाठी गायगव्हाण या गावाची निवड करण्यात आली होती. रब्बी हंगामाच्या शेवटी सुमारे एक महिन्यापूर्वी हे सर्व पाच टन बियाणे कृषी सहायक आर. एम. गायकवाड यांनी ठराविक दलालामार्फत गायगव्हाण गावात पाठविले. या योजनेची कोणत्याही प्रकारची माहिती ग्रामपंचायत अथवा इतर कोणत्याही यंत्रणेमार्फत गावातील शेतकर्‍यांनी देण्यात आली नाही. मंडल कृषी अधिकारी गस्ते, कृषी सहायक आर.एम.गायकवाड, कृषी पर्यवेक्षक वाघमोडे या सर्वांनी संगनमत करून गायगव्हाण येथील दलालास हाताला धरून हे सर्व बियाणे ठराविक एक-दोघा शेतकर्‍यांनाच विकले आहे. ही माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहचू नये, याची खबरदारी यांनी घेतली होती.या योजनेची माहिती समजल्यानंतर येथील शेतकर्‍यांनी महुद मंडल कृषी कार्यालयाकडे धाव घेतली व विचारणा केली. शिवाय बियाणे वाटप कोणत्या निकषाने, कसे केले, लाभार्थी शेतकर्‍यांची यादी द्यावी अशी मागणी केली. मंडलाधिकारी गस्ते, कृषी सहायक गायकवाड यांची वारंवार भेट घेतली. मात्र दोघांनीही शेतकर्‍यांना अरेरावीची भाषा वापरून हकलून दिले.

-------------------------------------अधिकार्‍यांकडून धमकीलाभार्थी शेतकर्‍यांची यादी तुम्हाला देता येणार नाही व वारंवार तुम्ही मागणी केली तर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तुमच्यावर केस दाखल करीन असा उलट दम या अधिकार्‍यांनी दिला असल्याचे तक्रारदार राजेंद्र साळुंखे, कैलास देवकते, महावीर साळुंखे, संतोष पाटील, आकाश खांडेकर यांनी सांगितले.---------------------------------मोफत गहू वाटप योजनेचे बियाणे तालुक्यास उशिरा प्राप्त झाले, त्यामुळे इतर कोणत्याही मंडलमध्ये ही योजना राबविली नाही. महुद मंडलमध्ये शेतकर्‍यांना लाभ देण्यासाठी आम्ही राबविली. कृषी सहायक गायकवाड यांनी बियाणे वाटप योग्य केले आहे. मात्र शेतकर्‍यांची अजूनही तक्रार असल्यास त्याची चौकशी केली जाईल.- गस्तेमहुद मंडल कृषी अधिकारी-----------------------------------शासनाच्या विविध योजना महुद मंडलमधील अधिकारी दलालांमार्फत राबवित असतात.बियाणे,खते,औषधे यासह इतर कोणत्याही वस्तू सामान्य शेतकर्‍यांना दिल्या जात नाहीत.ठराविक धनदांडगे शेतकरी,व्यापारी या योजनांचा लाभ घेतात.- कैलास देवकते, महावीर साळुंखे गायगव्हाण