दिलीपकुमार शहा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST2021-02-05T06:45:42+5:302021-02-05T06:45:42+5:30

मोडनिंब : येथील व्यापारी दिलीपकुमार जयकुमार शहा (७०, विश्राम चौक, मोडनिंब, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

Dilip Kumar Shah passed away | दिलीपकुमार शहा यांचे निधन

दिलीपकुमार शहा यांचे निधन

मोडनिंब : येथील व्यापारी दिलीपकुमार जयकुमार शहा (७०, विश्राम चौक, मोडनिंब, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

उत्तम बंडगर

वडवळ : निवृत्त रेल्वे कर्मचारी उत्तम भगवान बंडगर (८०, रा. मलिकपेठ, ता. मोहोळ) यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आदर्श शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष हनुमंत बंडगर यांचे ते वडील होत.

सुभद्राबाई बोगा

सोलापूर : सुभद्राबाई बालाजी बोगा (७८, रा. दत्तनगर, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ऑनलाईन व्यावसायिक राम बोगा यांच्या त्या आजी होत.

शकुनदेवी कोचर

सोलापूर : शकुनदेवी कोचर (६३, रा. कोठारी अपार्टमेंट, कोचर गल्ली, बुधले गल्ली, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, जावई, दीर, भावजय असा परिवार आहे.

विष्णुपंत कांबळे

सोलापूर : विष्णुपंत सिद्राम कांबळे (पेंटर) (८२, रा. किसान संकुल, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.

गिरीष भोईटे

सोलापूर : खो-खोपटू गिरीष काशिनाथ भोईटे ( ४४, रा. गडदर्शन सोसायटी, दमाणी नगर, सोलापूर ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश भोईटे यांचे ते कनिष्ठ बंधू होत.

गोदाबाई फंड

कामती : गोदाबाई विठ्ठल फंड ( ७५, रा. दादपूर, ता. मोहोळ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतिशील शेतकरी अंकुश फंड यांच्या त्या मातोश्री होत.

सुलोचना म्हमाणे

कामती : सुलोचना अंबादास म्हमाणे ( ८०, रा. कोरवली, ता. मोहोळ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतिशील शेतकरी महासिद्ध म्हमाणे यांच्या त्या मातोश्री होत.

Web Title: Dilip Kumar Shah passed away