शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

देवगडची वारी पंढरीच्या दारी

By admin | Updated: July 3, 2014 01:27 IST

आठशे मोटरसायकली, सोळाशे वारकरी

पंढरपूर : ‘जाता पंढरीशी सुख वाटे जीवा। भेटतो तेव्हा नारायण’ या संत वचनाप्रमाणे देवगड (ता. नेवासा, जि. अहमदनगर) येथून सोमवारी सकाळी नऊ वाजता मोटरसायकलवर निघालेली भाविकांची वारी मंगळवारी नवीन पुलानजीकच्या भास्करगिरी महाराज मठात विसावली. दिवसभरात पंढरीच्या राणाचे डोळे भरुन दर्शन घेऊन ही वारी आज (बुधवारी) देवगकडे रवाना झाली. हजारो वर्षांची परंपरा असलेली पंढरीची वारी आता बदलत्या काळाबरोबर हायटेक होऊ लागली असून, बैलगाडीच्या ताफ्यासह पायी चालत येणारे भाविक आता वेगवेगळ्या वाहनांतून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येऊ लागले आहेत. देवगड येथील दिनकर गर्जे यांच्या नेतृत्वाखाली आठशे मोटरसायकलस्वारांनी आगळी वेगळी दिंडी काढली. यामध्ये १६०० भाविक आहेत. मोटरसायकलवर पताका फडकावत ३00 कि. मी. अंतर पार करून आलेल्या दिंडीतील भाविकांनी पंढरपुरातही मोटरसायकलवरून नगरप्रदक्षिणा करीत भास्करगिरी महाराज मठात मुक्काम केला.आठ वर्षांपूर्वी पंधराशे मोटरसायकलने ही दिंडी सुरूवात करण्यात आली. आता यामध्ये आठशे मोटरसायकली असून, पेट्रोलचा खर्च यात सहभागी होणारे भाविक करीत असून, जेवण, निवासाचा खर्च दिंडी प्रमुख दिनकरराव गर्जे, अजित फाटके, नगरचे रामभाऊ खंडाळे व दिलीपराव वाघचवरे हे करीत आहेत. यामध्ये कोणीही सहभागी झाल्यास त्यांचे स्वागत करण्यात येत असून, या दिंडीत सहभागी होण्यासाठी काहीच अट नाही. आज नगरप्रदक्षिणा करून ही दिंडी पंढरीत विसावली असून, बुधवारी सकाळी पुन्हा परतीच्या मार्गाला लागणार आहे.