शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या संमतीनेच आपली उमेदवारी

By admin | Updated: September 24, 2014 13:57 IST

उमेदवारी जाहीर केल्यावर थेट मते मागण्यासाठीच येतात; पण मी जनतेच्या दरबारात जाऊन त्यांच्या परवानगीनेच उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे प्रतिपादन विठ्ठल शुगर्सचे संस्थापक चेअरमन संजय शिंदे यांनी केले.

कुडरूवाडी: बेरोजगारीचे प्रश्न, महिलांच्या रोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी यंत्रमागासारखे घरगुती उद्योग उभे करण्याचा आपला मानस आहे. आजपर्यंत अनेक जण 

मतदार संपर्क अभियानांतर्गत कुडरूवाडी शहरात कॉर्नर सभा आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी सुवासिनींनी उत्स्फूर्तपणे औक्षण करून तर युवा वर्गाने फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. 
कॉर्नर बैठकीची सुरुवात पंचशीलनगर येथून करण्यात आली. यावेळी संजय शिंदे म्हणाले, आतापर्यंत शिंदे कुटुंबीयांनी सूतगिरणी, साखर कारखाना, आसवनी प्रकल्पासह अनेक प्रकल्प उभे करून तरुणांच्या हाताला रोजगार, उसाला उत्तम भाव देण्याची कामे केली आहेत. 
संजय शिंदे हेच आमचा पक्ष आणि मतदारसंघातील विकासयात्री असल्याचे डॉ. करंदीकर यांनी सांगितले. तर शहरातील अनेक गटतट विसरून केवळ संजय शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन अमरकुमार माने यांनी केले.
यावेळी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक वामनराव उबाळे, मारुतीआबा बागल, माजी नगराध्यक्ष समीर मुलाणी, नवृत्ती गोरे, माढा तालुका मोटारमालक संघाचे अध्यक्ष दत्ताजी काकडे, हमाल पंचायतीचे अध्यक्ष सुरेश बागल, संजय गोरे, अर्जुन बागल, बाबा गवळी, बबनराव बागल, डॉ. जयंत करंदीकर, उमरसाहेब दारुवाले, स्वातंत्र्यसैनिक भगवान जवंजाळ, पद्माकर काशीद, राजाभाऊ भाटे, महेश गांधी, युसूफ दाळवाले, अमरकुमार माने, लतीब मुलाणी, सूर्यकांत गोरे, अरुण काकडे, राजाभाऊ सुसलादे, संतोष अनभुले, अण्णासाहेब ढाणे वस्ताद, आनंद रजपूत, संजय साठे, प्रभाकर गोरे, दिलीप सोनवर, गणेश गोरे, संजय अस्वरे, अतुल फडतरे, अशोक चव्हाण, लक्ष्मण अस्वरे, अफसर मुलाणी, हरिदास बागल, संभाजी चौधरी, पांडुरंग सुतार, शंकर बागल, राहुल गायकवाड, मुन्ना अनंतकवळस, शरद काळे, पप्पू भिसे, दर्शन काशीद, अनिल खडतरे, अरुण इंगोले, संतोष शिंदे, आनंद टोणपे, बबलू कांबळे, सोनू मोरे, सचिन वाळके, संदीप भराटे, सागर गोफणे, सतीश महिंगडे, सुनील मुसळे, अमित खोत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर) 
२७ ठिकाणी कॉर्नर सभा 
■ पंचशीलनगर, नालसाहबनगर, सावित्रीबाई फुलेनगर, बालाजीनगर, रेल्वे वसाहत, देवकते वस्ती, आदर्शनगर, आवताडे वसाहत, भीमनगर, गोल काडादी चाळ, सिद्धेश्‍वरनगर, साई कॉलनी, वाघ वस्ती, चौधरी प्लॉट, भूषण लॉजजवळ, दाळवाले गल्ली, राधाकृष्ण नगर, म्हसोबा गल्ली, शिवाजी चौक, ठोकडे मिल, पटेल चौक, पोर्टर चाळ, कै. दशरथ गोरे नगर, भारत गॅस गोडावूनजवळ, फिल्टर पंप, गीताबाईचा मळा अशा २७ ठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात आल्या.