On coming to Pandharpur, Sunil Tatkare visited Bhalke | Maharashtra Election 2019; पंढरपुरात येताच सुनील तटकरे भालकेंच्या भेटीला

Maharashtra Election 2019; पंढरपुरात येताच सुनील तटकरे भालकेंच्या भेटीला

ठळक मुद्देश्री विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या खा. सुनील तटकरे यांनी माजी आमदार भारत भालके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलीदरम्यान, पंढरपुरात आल्यानंतर भारत भालके यांनी त्यांचे  स्वागत केले

पंढरपूर : माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यात अनेकांना खासदार, आमदार केले, महामंडळ दिले. मात्र, आज तीच मंडळी पवारांच्या विरोधात उभी आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भारत भालके यांना उमेदवारी देत असताना त्यांचेही काम महत्त्वाचे ठरणार असल्याचे खा. सुनील तटकरे यांनी सांगितले. 

श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या खा. सुनील तटकरे यांनी माजी आमदार भारत भालके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहताना अनेकांशी जवळून संपर्क आला. खा. शरद पवार यांचे प्रत्येक घडामोडीवर लक्ष असते. राज्यभरात त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता शेतकºयांना बदल आवश्यक वाटत असल्याचे खा. तटकरे म्हणाले.

 

दरम्यान, पंढरपुरात आल्यानंतर भारत भालके यांनी त्यांचे  स्वागत केले. यावेळी राष्टÑवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, राष्टÑवादी युवकचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, दिनकर पाटील, अर्जुन पाटील, लक्ष्मण पवार, मोहन कोळेकर, विजयसिंह   देशमुख, आप्पासाहेब भिंगे,  संतोष सुळे आदी उपस्थित होते. 

Web Title: On coming to Pandharpur, Sunil Tatkare visited Bhalke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.