शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सुमारे २० टक्के वारी घटण्याची शक्यता

By admin | Updated: July 7, 2014 00:52 IST

आता एक दिवसाच्या आषाढीचीच आशा

 भंडीशेगाव: यंदाच्या आषाढी वारीवर दुष्काळाचे सावट असल्याने ४० टक्के वारकरी कमी आले. असे असले तरी ऐन आषाढीत एक दिवसाच्या वारीसाठी २० टक्के तरी वारकरी थेट पंढरपुरात येत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २० टक्के वारी कमी भरेल, असा अंदाज आहे.पंढरपूरला येणाऱ्या संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या दोन मुख्य पालख्यांसमवेत दरवर्षी किमान चार लाख आषाढीची वारी १० लाखांपर्यंत जाते. यंदा मात्र दोन्ही पालख्या मिळून अडीच लाख वारकरी वाटचाल करीत आहेत. पाऊस पडो अथवा न पडो या विचाराने यात आणखी २० टक्के वाढ होईल असे अपेक्षित आहे, असे अनेक दिंडीकऱ्यांचे मत आहे. यामुळे सात ते साडेसात लाखांपर्यंत आषाढीचा सोहळा जाईल अशी अपेक्षा आहे. याबाबत वासकर दिंडीचे राणू महाराज वासकर यांना विचारले असता, गतवर्षी आपल्या दिंडीत १००० वारकरी होते. यंदा ६५० वारकरी आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आषाढी दिवशी यात थोडी वाढ होईल, असे ते म्हणाले. पुण्याच्या मावळ भीमाशंकर परिसरात पाऊस नसल्याने भाताची लावणी झालेली नाही. आता पाऊस पडला तरी रोपे जळाल्याने नव्याने रोपे तयार करावी लागणार आहेत. या परिसरातून आलेल्या आंबेगाव तालुका दिंडीचे प्रमुख डी.आर. शिंदे, सचिव डॉ. बोराडे म्हणाले, भाताची लागण न झाल्याने आमच्या दिंडीत गतवर्षीच्या तुलनेत ६०० ऐवजी ५०० वारकरी आले आहेत.सातारा परिसरातून आलेल्या शांत मारुती वैष्णव मंडळ दिंडीचे प्रमुख विजय शरद लेवे म्हणाले, आमच्या दिंडीतही २५० ऐवजी २०० वारकरी आले आहेत.तिंतरवणी ता. गेवराई (जि. बीड) येथून श्रीराम संस्थानची दिंडी आली आहे. पावसाअभावी आमच्या भागात कापूस, बाजरी, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांचा पेरा झालेला नाही. यामुळे ५०० ऐवजी ३०० वारकरी यंदा आले आहेत.---------------------------एकंदरीत ४० टक्के वारीत घट झाली असली तरी एक दिवसाच्या वारीसाठी २० टक्के वारकरी येतील, अशी आशा आहे. यामुळे यंदा २० टक्के वारी कमी भरेल, असे दिंडीकऱ्यांना वाटते.