शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातील भाजप सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू; दिलीप वळसे-पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 13:33 IST

दिल्लीतील शरद पवार यांच्या घराची सुरक्षा काढल्यावरून राष्ट्रवादीचे मंत्री आक्रमक

ठळक मुद्देदिलीप वळसे-पाटील आज सोलापूर जिल्हा दौ-यावरवळसे पाटील यांनी घेतले पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शनसोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादीच्या मेळाव्यात राहणार उपस्थित

पंढरपूर : दिल्लीतील शरद पवार यांच्या घराची सुरक्षा काढल्यावरून केंद्राचे सूडाचे राजकारण सुरु असल्याची केली टीका कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी केली. 

 पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी व्यापक बैठक घेण्यात येईल असेही  वळसे-पाटील यांनी आज येथे सांगितले.      दिलीप वळसे-पाटील यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार भारत भालके यांनी पंढरपूर विकासाच्या अनुषंगाने मुद्दे मांडले. त्यावेळी पालकमंत्री वळसे-पाटील यांनी बैठक घेतली जाईल, असे सांगितले.  यावेळी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, माजी आमदार दीपक-आबा साळुंखे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, मंदीर समितीचे सदस्य संभाजी शिंदे आदी उपस्थित होते            तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून आत्तापर्यंत झालेली कामे, आगामी करावयाची कामे याबाबत सर्वंकष चर्चा केली जाईल. पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यास जास्तीत-जास्त सुविधा देण्याच्या अनुषंगाने विचार केला जाईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले   आमदार भारत भालके यांनी पंढरपुरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पंढरपूरच्या विविध प्रलंबित कामांना गती देण्यासाठी निधीची आवश्यकता आहे, असे सांगितले. तत्पूर्वी, पालकमंत्री वळसे- पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार भारत भालके, माजी आमदार दीपक आबा साळुंखे उपस्थित होते तत्पूर्वी,  शासकीय  विश्रामगृह  येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आनळे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी  पालकमंत्री  वळसे- पाटील यांचे स्वागत केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस