मोठी बातमी; सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी शिरीषकुमार सरदेशपांडे रूजू

By Appasaheb.patil | Published: October 22, 2022 06:27 PM2022-10-22T18:27:44+5:302022-10-22T18:27:44+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

big news; Shirish Kumar Sardeshpande will join as Solapur Rural Superintendent of Police | मोठी बातमी; सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी शिरीषकुमार सरदेशपांडे रूजू

मोठी बातमी; सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी शिरीषकुमार सरदेशपांडे रूजू

googlenewsNext

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या नूतन पोलीस अधीक्षक पदाची सुत्रे शिरीष सरदेशपांडे यांनी सुत्रे हाती घेतली. तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडून शनिवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी पदभार घेतला. अधीक्षक सातपुते यांनी सरदेशपांडे यांचे सोलापुरात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी काही अधिकार्यांशी संवाद साधत ग्रामीण पोलिस दलाची माहिती जाणून घेतली.

दरम्यान सरदेशपांडे यांनी पदभार घेतला मात्र रविवारी सकाळी साडेअकरा वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले. राज्याच्या गृह विभागाने राज्यातील २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये सोलापूर पोलीस अधीक्षक पदी सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी पोलीस अकादमी नाशिकचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेजस्वी सातपुते यांना अद्यापही पदस्थापना मिळालेली नाही. त्याबाबतचा आदेश लवकरच निघणार असल्याचे सांगण्यात आले.

-----------

 

Web Title: big news; Shirish Kumar Sardeshpande will join as Solapur Rural Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.