शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
4
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
5
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
6
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
7
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
9
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
10
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
11
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
12
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
13
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
14
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
15
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
16
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
17
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
18
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
19
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
20
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! हायवेशेजारी थांबलेल्या ट्रकला कारची धडक; सोलापूरच्या तिघांचा जागीच मृत्यू

By आप्पासाहेब पाटील | Updated: May 7, 2026 14:06 IST

हा अपघात सोलापूर-हैद्राबाद रोडवर गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडला.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: भरधाव वेगात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. या धडकेत सोलापूर शहरातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सोलापूर-हैद्राबाद रोडवरील शेळगी पुलावर गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडला. 

शेखर सुरेकर (वय ३३, रा. कुमठा नाका, सोलापूर), अमोल धैर्यशील येरटे (वय ४०, रा. दाळगे प्लॉट, भवानी पेठ, सोलापूर) व कादर सैदू हांडे (वय ३३, कुमठा नाका) अशी मृत तिघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोलापूर शहरात असलेल्या दुचाकी शोरूममधील तिघे मित्र बुधवारी रात्री जेवणासाठी ढाब्यावर गेले होते. जेवण करून परत शहरात येत असताना हा अपघात झाला. सोलापूर शहरातील पुणे नाका ते मार्केट यार्ड रोड (हैद्राबाद रोड) कडे भरधाव वेगात कार जात होती. अचानक चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जोरात धडकली. या धडकेत कार चक्काचूर झाली असून कारमधील तिघांचा दोघांचा जागीच तर एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. सध्या शासकीय रूग्णालयात तिघांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. तिघांच्या निधनाने शासकीय रूग्णालयात मोठी गर्दी झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur: Car crashes into truck, three die on the spot.

Web Summary : Three Solapur residents died early Thursday when their car crashed into a parked truck on the Solapur-Hyderabad road. The victims, returning from dinner, lost control of their vehicle. The car was severely damaged, and the deceased are undergoing post-mortem examination.
टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात