शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अबुधाबीहून आलेल्या बार्शीकराला मुंबईतून सोडले;सोलापूरच्या प्रशासनाने मात्र सिव्हिलमध्ये हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 11:02 IST

कोणतीही रिस्क न घेण्याची तयारी; आता फक्त तीन रुग्ण अ‍ॅडमिट, ७३ जण घरीच निगराणीखाली

ठळक मुद्देलग्नाला हजर राहणाºयांची डायरीत नोंद आवश्यक; लग्न सोहळ्याला फक्त ५0 जणांनाच हजर राहण्याला परवानगी गर्दी लक्षात घेता आठवडा बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गावात अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा भाजीपाला व धान्य खरेदीचे व्यवहार सुरू राहणार

बार्शी : दुबईवरून दोन दिवसांपूर्वी उक्कडगाव (ता़ बार्शी) येथे आलेल्या तरुणास निगराणीखाली ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र माळी यांनी दिली. 

तो तरुण दुबईतील अबुधाबीमध्ये नोकरीनिमित्त गेला होता. दोन दिवसांपूर्वी तो गावी परतला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. कोणतीच लक्षणे नसल्याने १५ दिवस घरीच राहण्याबाबची सूचना देऊन मुंबई आरोग्य विभागाने त्याला गावी जाण्यास परवानगी दिली आहे. पण तो गावी आल्यावर आरोग्य विभागाला माहिती मिळाल्याने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे पांगरी रुग्णालयात त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली व मागील इतिहास तपासून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

तो तरुण ठणठणीत असून, सध्या कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी निगराणीखाली ठेवण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. याचबरोबर बार्शी शहरातील एका संशयिताला बार्शीच्या ग्रामीण रुग्णालायत स्वतंत्र कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. 

‘त्या’ क्लिपमुळे चर्चामंगळवारी बार्शीतील एका तरुणाने सोशल मीडियावर एक वादग्रस्त आॅडिओ क्लिप प्रसारित केली आहे. या क्लिपमधील व्यक्तींच्या संवादामुळे शहरात चर्चा सुरू झाली. याबाबत तक्रारी आल्यानंतर बार्शी नगरपरिषदेच्या वैद्यकीय अधिकाºयांनी संबंधितांचा शोध घेतला. त्या संशयितास बार्शी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आढावा बैठकीत प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनातर्फे कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.शहर-जिल्ह्यात आता नव्याने रुग्ण आढळलेले नाहीत.

आतापर्यंत १० रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. या संशयितांचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी ७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. अद्याप तीन रुग्णांचा अहवाल येणे बाकी असून, ते अजूनही रुग्णालयात आहेत. त्यांची तब्येत ठीक आहे. २७ जणांना विशेष कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले होते. त्यापैकी २० विद्यार्थ्यांना यापूर्वीच त्यांच्या घरी नेऊन सोडण्यात आले आहे तर सात जणांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर बुधवारी त्यांनाही घरी पाठविण्यात आले आहे. याशिवाय संशयित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ८८ जणांना घरातच निगराणीखाली ठेवण्यात आले होते. त्यातील १५ जणांची तब्येत ठीक असल्याने निगराणी काढली आहे. उर्वरित ७३ जणांचा दररोज तपासणी अहवाल घेतला जात आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंंधासाठी मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली आहे. त्यामुळे नवीन संशयित आढळलेला नाही. पुणे व इतर ठिकाणाहून येणाºया प्रवाशांवर लक्ष ठेवले जात आहे तसेच लक्षणे आढळणाºया संशयितांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण मोहीम जारी आहे. 

आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय- यापूर्वी नगरपालिका हद्दीतील आठवडा बाजार बंद करण्यात आले होते. ग्रामपंचायत हद्दीतील आठवडा बाजार सुरू होते. पण बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता आठवडा बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्व गावांमध्ये दवंडी दिली जात आहे. पण गावात अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा भाजीपाला व धान्य खरेदीचे व्यवहार सुरू राहणार आहेत. जनावरांचे बाजार व गर्दी होणारे आठवडा बाजार बंद राहणार आहेत. 

लग्नाला हजर राहणाºयांची डायरीत नोंद आवश्यक- १९ मार्च रोजी लग्नाची तिथी असल्याने शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी लग्नं होणार आहेत. या लग्न सोहळ्याला फक्त ५0 जणांनाच हजर राहण्याला परवानगी देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी लग्न असेल तिथे ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिकेचे कर्मचारी जातील व नियमाप्रमाणे लोक आहेत की नाही, याची खातरजमा करतील. नियमभंग करणाºयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिला. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याbarshi-acबार्शीhospitalहॉस्पिटल