शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आनंद चंदनशिवेंसह पदाधिकाºयांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:49 AM

महापुरुष मूर्ती अवमानप्रकरण;  शिवप्रेमींनी केली पोलीस आयुक्तालयासमोर निदर्शने

ठळक मुद्देलोकभावनेची दखल घेत आनंद चंदनशिवे व त्यांच्या पदाधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील कायदा व शांतता बिघडू नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी - पोलीस आयुक्तसोशल मीडियावरून समाजाच्या भावना दुखावतील, अशा पोस्ट करू नयेत - पोलीस

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत कोलंबिया युनिव्हर्सिटीसमोर ठेवण्यात आलेल्या प्रचलित सिंहासनावर बसविण्यात आलेल्या पुतळ्यावरून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी नगरसेवक आनंद चंदनशिवे, उत्सव समिती अध्यक्ष अक्षय प्रकाश माने यांच्यासह पदाधिकाºयांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी. बी. ग्रुप) च्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या प्रतिकृतीचा देखावा तयार करण्यात आला होता. युनिव्हर्सिटीसमोर सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगावर असलेल्या प्रचलित पोशाखाप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला होता. ही बाब लोकांच्या नजरेत आल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ही बाब संबंधित मंडळाचे आधारस्तंभ नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या लक्षात आणून दिली. 

या प्रकारामुळे दोन्ही समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, अशा प्रकारची मूर्ती बसवून दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. लावण्यात आलेल्या मूर्तीमुळे दोन्ही समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, अशी फिर्याद ललित मिलिंद धावणे (वय २३, रा. गोल्ड फिंच पेठ, शिंदे चौक, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसात दिली आहे. भादंवि कलम १५३ (अ) प्रमाणे दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा  दाखल झाला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे करीत आहेत.  

मूर्तीमुळे भावना दुखावल्यास दिलगिरी : चंदनशिवेच्कोणताही सामाजिक उपक्रम असो किंवा मिरवणूक प्रथमत: छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून त्याची सुरुवात करत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिवरणुकीत कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या देखाव्यासमोर बसविण्यात आलेली मूर्ती ही पुणे येथील प्रसिद्ध मूर्तिकार सुभाष आल्हाट यांच्याकडून भाड्याने मागविण्यात आली होती. नागरिकांच्या तक्रारीवरून पोलीस अधिकाºयांनी ही बाब आमच्या लक्षात आणून दिली. तत्काळ आम्ही मूर्ती हटवून मिरवणूक पूर्ण केली. शिवसैनिक व भीमसैनिकांच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. भावना दुखावल्या असल्यास मी मंडळाचा मार्गदर्शक या नात्याने जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असे मत नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केले आहे. 

लोकभावनेची दखल घेत आनंद चंदनशिवे व त्यांच्या पदाधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कायदा व शांतता बिघडू नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी. सोशल मीडियावरून समाजाच्या भावना दुखावतील, अशा पोस्ट करू नयेत, शहराची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल. - महादेव तांबडे, पोलीस आयुक्त. 

टॅग्स :SolapurसोलापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस