अनोळखी मुलानं काढली अल्पवयीन मुलीची छेड; पित्याची पोलीस ठाण्यात धाव

By रवींद्र देशमुख | Updated: July 11, 2024 19:02 IST2024-07-11T18:59:55+5:302024-07-11T19:02:24+5:30

लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

An unknown boy molested a minor girl | अनोळखी मुलानं काढली अल्पवयीन मुलीची छेड; पित्याची पोलीस ठाण्यात धाव

अनोळखी मुलानं काढली अल्पवयीन मुलीची छेड; पित्याची पोलीस ठाण्यात धाव

सोलापूर : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुकानात आलेल्या अनोळखी मुलानं छेड काढून अश्लील भाषा वापरल्याचा प्रकार शहरातील एका परिसरात बुधवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी पित्यानं पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी सदर बझार पोलीस ठाण्यात बीएनस ७४,११५, (२), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुरुवारी गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीचे शहरातील एका परिसरात किरणा दुकान आहे. फिर्यादीची १४ वर्षीय मुलगी दुकान बसलेली होती. बुधवारी रात्री १० च्या सुमारास अनोळखी मुलगा गिऱ्हाईक म्हणून आला. त्याने मुलीची छेड काढून लज्जास्पद वर्तन केले आणि पळून गेला.
या प्रकाराबद्दल फिर्यादीच्या मुलीने घरातील लोकांना आवाज देऊन झाल्या प्रकाराची माहिती दिली. फिर्यादीने सदर बझार पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्याने बाललैंगिक छळाचा गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास फौजदार बनकर करीत आहेत.

Web Title: An unknown boy molested a minor girl