शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात नथीचा नखरानंतर आता सुरू झाला वैभव विभूतीचा ट्रेंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 17:54 IST

सोशल मीडियावर प्रतिसाद : सोलापुरातील आबालवृद्धांचे फोटो झळकू लागले 

ठळक मुद्देवीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या ‘वैभव विभूतीचे’ या ट्रेंडला समाजातून खूप मोठा प्रतिसाद केवळ महिलाच नव्हे तर पुरुष मंडळी, लहान मुले, मुली व तरुण-तरुणी देखील मोठ्या उत्साहाने या ट्रेंडमध्ये सहभागीआपल्या कपाळावर विभूती लावून त्याचा फोटो व व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करावयाचे आवाहन

सोलापूर : महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात समतेचा संदेश दिला. हा संदेश देत असताना त्यांनी विभूतीचे महत्त्वही सांगितले. विभूती लावल्यामुळे मनात सकारात्मक विचार निर्माण होतो अन् हाच विचार कोरोनाशी दोन हात करताना बळ मिळवून देतो. हा धागा पकडून वीरशैव व्हिजनने सोशल मीडियावर  आता ‘वैभव विभूतीचे’ ट्रेंड सुरू केला असून, नथीचा नखरानंतर यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

सध्या महिलांमध्ये साडी चॅलेंज, नथीचा नखरा अनेक ट्रेंड अथवा चॅलेंज चालू आहेत. त्यामध्ये महिला त्या ट्रेंडप्रमाणे फोटो काढून अथवा व्हिडिओ करून सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत.  त्याच पद्धतीने वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या वतीने ‘वैभव विभूतीचे’ हा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. यामध्ये आपल्या कपाळावर विभूती लावून त्याचा फोटो व व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करावयाचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोरोनातून मुक्त कर अशी प्रार्थना ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्याकडे या माध्यमातून करत असल्याचे वीरशैव व्हिजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी यांनी सांगितले. 

वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या ‘वैभव विभूतीचे’ या ट्रेंडला समाजातून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. केवळ महिलाच नव्हे तर पुरुष मंडळी, लहान मुले, मुली व तरुण-तरुणी देखील मोठ्या उत्साहाने या ट्रेंडमध्ये सहभागी होत असल्याचे कार्याध्यक्षा रेणुका सर्जे-चाकोते यांनी सांगितले.

हा ट्रेंड यशस्वी करण्यासाठी वीरशैव व्हिजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिवा माधुरी बिराजदार, सहसचिवा श्रीदेवी पाच्छापुरे-कोनापुरे, कार्याध्यक्षा रेणुका सर्जे-चाकोते, सहकार्याध्यक्षा पल्लवी हुमनाबादकर, कोषाध्यक्षा ज्योती शेटे, सहकोषाध्यक्षा राजश्री गोटे, प्रसिद्धीप्रमुख सुचित्रा बिराजदार, रेणुका धुमाळे, स्वीटी करजगीकर, कल्पना तोटद, रेश्मा निडगुंडी, पूजा साखरे, गायत्री गाढवे, गौरी खंडाळे, अमृता नकाते, पुष्पा कत्ते, दीपा तोटद, मंगल परशेट्टी, अरुंधती शेटे आदी परिश्रम घेत आहेत.

विभूतीने मानसिक स्वास्थ्य चांगले राहते - विभूतीचे महत्त्व व विभूती लावण्याचे कारण सांगण्याचा प्रयत्न वीरशैव व्हिजन महिला आघाडी करत आहे. विभूती लावणे हे भगवान शंकराच्याप्रती सन्मान व्यक्त करण्याचा प्रकार मानला जातो. विभूतीमधील तीनही रेषा प्रतिकात्मक मानल्या जातात. पहिली रेषा अहंकाराला दूर करण्याचे प्रतीक आहे. दुसरी रेषा अज्ञानपणा दूर करण्याचे प्रतीक आहे आणि तिसरी रेषा वाईट कर्मांना दूर करण्याचे प्रतीक आहे. विभूती लावल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विभूतीमुळे शरीरातील सात चक्र नियंत्रित करण्यास मदत होते. विभूती मस्तकावर धारण केल्याने ध्यान, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडिया