विधानसभेसाठी कामाला लागा - आदित्य ठाकरे

By Admin | Updated: June 25, 2014 01:56 IST2014-06-25T01:56:15+5:302014-06-25T01:56:15+5:30

जोमाने कामाला लागण्याचे आवाहन

Aditya Thakare to work for assembly | विधानसभेसाठी कामाला लागा - आदित्य ठाकरे

विधानसभेसाठी कामाला लागा - आदित्य ठाकरे


सोलापूर : केंद्रात भाजपा-शिवसेना युतीचा भगवा फडकला. आता विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
सोलापूर युवा सेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांचा मातोश्रीवर सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
केंद्रातील काँग्रेसची सत्ता उद्ध्वस्त करून भाजपा-शिवसेना युतीची सत्ता आली आहे. आता महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपा-शिवसेना युतीने कंबर कसली आहे. केंद्रातील भाजपा-शिवसेनेची लाट आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहणार आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करावे, असेही ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख स्वप्नील वाघमारे, सुमित साळुंखे, प्रसाद नीळ, अतुल फुल्लेलू, किरण वाघमारे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Aditya Thakare to work for assembly