शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एकरात घेतले २९ टन फळपीक अन् उत्पन्न मिळवले अडीच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 12:18 IST

विभूते कुटुंबाची यशोगाथा; कोरवलीच्या कलिंगडाची करणी पोहोचली जर्मनीत

ठळक मुद्देशेतीत पैसे घालणे, मेहनत करणे म्हणजे निसर्गाबरोबर पैज लावण्यासारखेच असतेनिसर्गाने साथ दिली तर मालामाल अन् नाही दिली तर कंगाल असा नियम असतोकोरवली (ता.मोहोळ) येथील शेतकरी लक्ष्मण विभूते यांनी अन् मिळवले एकरी  अडीच लाखांचे उत्पन्न

नितीन उघडे 

कामती : शेतीत पैसे घालणे, मेहनत करणे म्हणजे निसर्गाबरोबर पैज लावण्यासारखेच असते. निसर्गाने साथ दिली तर मालामाल अन् नाही दिली तर कंगाल असा नियम असतो. या नियमाची पैज लावली कोरवली (ता.मोहोळ) येथील शेतकरी लक्ष्मण विभूते यांनी अन् मिळवले एकरी  अडीच लाखांचे उत्पन्न. आज या कलिंगडाची करणी जर्मनीत पोहोचली आहे.

ही यशोगाथा आहे लक्ष्मण विभूते यांची़ त्यांची नऊ एकर वडिलोपार्जित शेती कोरवली येथे आहे. लक्ष्मण यांनी  इलेक्ट्रीशियन पदवीपर्यंत शिक्षण घेतले़ पण त्यांनी नोकरी केली नाही. वडिलोपार्जित असणारी शेती कसण्यातच त्यांनी आनंद मानला़ या वर्षी नऊ एकर जमिनीपैकी एक एकरात चामुंडा ५५ या वाणाच्या कलिंगडाची लागवड केली. 

दोन महिन्यापूर्वी शेतीची मशागत करून एकरी दोन ट्रॉली  शेणखत टाकले. त्यानंतर ६ फूट अंतराचे बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरुण ठिबक सिंचन केले़  त्यानंतर दीड फूट अंतरावर एक कलिंगडाचे रोप याप्रमाणे ६ हजार रोपांची लागवड केली. ८ ते १० दिवसांच्या अंतराने खतांची मात्रा, योग्य वेळी पाणी आणि रासायनिक खते व औषधांची मात्रा दिली. या एक एकरावर लागवडीसाठी ६० हजार रुपये खर्च केले. दोन महिन्यातच कलिंगड विक्रीसाठी आले. शेतातून मिळालेला सर्व माल दिल्ली येथे पाठवण्यात आला़ पुढे त्या व्यापाºयांनी माल जर्मनीला निर्यात केला. 

कलिंगडकडचा कल वाढला - कमी कालावधीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल, यासाठी शेतकºयांचा प्रयत्न असतो. यातच मागील दोन वर्षांपासून कोरवली परिसरात अनेक शेतकरी कलिंगड लागवड करीत आहेत. या वर्षी मागील तीन महिन्यात कलिंगड लागवड करून पंचक्रोशीतून विक्रमी उत्पादन घेतले जात आहे. शेकडो एकर क्षेत्रात कलिंगड पीक पाहायला मिळते आहे़ ५० ते ६० दिवसात येणारे पीक त्यातही हमखास बाजारभाव मिळत असल्याने शेतकºयांचा कलिंगड लागवडीकडे कल वाढलेला दिसतोय़ सध्या स्थानिक बाजारपेठेसह परराज्यातून तसेच परदेशातूनही कलिंगडाला मागणी आहे. 

वडिलांनी मला इलेक्ट्रीशियन पदवीपर्यंत शिक्षण घेण्यास मदत केली. गरीब परिस्थिती असल्याने नोकरीची गरज होती़ पण गावात कलिंगडापासून जास्त उत्पन्न मिळत असल्याचे पाहून शेतीकडे वळलो. आता नोकरीची गरज नाही़ शेती करून आनंदी जीवन जगतो आहे़ प्रयोगशील शेती काळाची गरज आहे़ - लक्ष्मण विभूतेकलिंगड उत्पादक, कोरवली

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी