शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नादखुळा! ७ सीटर स्कॉर्पिओ गाडीनं केली शेताची नांगरणी; तरुणाचा भन्नाट जुगाड चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 12:46 IST

सोशल मीडियावर कायमच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत असतात.

Social Viral :सोशल मीडियावर कायमच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत असतात. काही व्हिडिओ नेटकऱ्यांना खळखळू हसवतात तर काही व्हिडिओ बौद्धिक खुराक पुरवणारे असतात. असाच एका शेतकरी युवकाचा भन्नाट व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. 

शेती बेभरवशाची असते असं म्हणतात. पण, बाजारपेठेचा अभ्यास हवामान विभागाचा योग्य सल्ला यातून शेती केली तर फायदेशीर ठरतेच. त्यातच आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकरी लाखोंची उलाढाल करतान दिसत आहेत. यामुळे वेळ आणि पैसाही वाचत आहे. 

पूर्वी शेती पारंपरिक पद्धतीने केली जात होती.  त्यासाठी बैल किंवा जनावरांच्या मदतीने चिखलणी होत होती. पण, अलिकडे चिखलणी करण्यासाठी यंत्रे आली आहेत. ट्रॅक्टर तसेच पॉवर टिलर व रोटावेटर यांच्या माध्यमातून चिखलणी करण्यात येते. पण या व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणाने अशी काही शक्कल  लढवली आहे, जे पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

 सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एका शेतामध्ये महिंद्रा कंपनीची कार चालताना दिसत आहे. मातीने रंगलेल्या कारमध्ये एक तरुण बसलेला आहे. पण मध्यातच तो कारमधून बाहेर पडतो. खरी गंमत म्हणजे, या स्कॉर्पिओ गाडीच्या पाठीमागे चक्क नांगर बसवण्यात आला आहे. हा नांगर सध्या विशेष लक्षवेधी ठरतोय. एका ७ सीटर गाडीचा असाही उपयोग होऊ शकतो. याचा अंदाजही कोणालाही आला नसेल. स्कॉर्पिओ गाडीच्या साहाय्याने शेती नांगरणाऱ्या या शेतकऱ्याची भन्नाट कल्पना नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. 

rahul_raosaheb नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर यूजर्सनी या व्हायरल व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडल्याचं चित्र दिसून येत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFarmerशेतकरी