शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : व्यक्तीने खांद्यावर उचलून नेला भलामोठा अजगर, रूममधील नजारा पाहून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 16:34 IST

Paython Viral Video : यात एक व्यक्ती एका अजगराला खांद्यावर घेऊन जाताना दिसतोय. तो एका रूमध्ये जातो आणि तिथे जे दिसतं ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

Paython Viral Video : सापाचं नाव काढताच अनेकांना घाम फुटतो. साप दुरून जरी दिसला तरी लोकांची रात्रीची झोप उडते. अनेक लोक तर सापांना इतके घाबरतात की, त्यांचे व्हिडीओ देखील बघत नाहीत. अशात जर अजगर समोर आला तर मग विषयच संपतो. अजगर व्यक्तीला जिवंत गिळू शकतो. पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो बघून तुम्ही हैराण व्हाल. यात एक व्यक्ती एका अजगराला खांद्यावर घेऊन जाताना दिसतोय. तो एका रूमध्ये जातो आणि तिथे जे दिसतं ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

@jayprehistoricpets नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सापांसंबंधी व्हिडीओ पोस्ट केले जातात. हा व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे. ज्यात एक व्यक्ती एक भलामोठा अजगर आपल्या खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. हा अजगर इतका मोठा आहे की, व्यक्ती त्याला व्यवस्थित उचलूही शकत नाहीये. तो अजगराला एका रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा तिथे आणखी काही अजगर दिसतात. 

रूमचा दरवाजा उघडताच तिथे वेगवेगळ्या रंगाचे मोठमोठे अजगर दिसतात. पिवळ्या-काळ्या रंगाचे अजगर या रूममध्ये आहेत. एकाच जागी इतके अजगर पाहून कुणाचीही झोप उडेल. या व्यक्तीने सांगितलं की, रूममध्ये २०-२० फुटांच्या २० मादा अजगर आहेत. 

दरम्यान, या व्हिडिओला आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, 'सगळे अजगर एकाच जागी राहतात, मग त्यांच्या भांडणं वगैरे होतात का?'. तर दुसऱ्याने लिहिलं की, 'हे सगळे एका ठिकाणी राहतात तर मग एकमेकांना खात का नाहीत?'. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके