Video: आईचं धाडस!! पिलांना वाचवण्यासाठी थेट सापाशी भिडली मांजर, पुढे जे झालं ते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 20:44 IST2023-10-08T20:43:23+5:302023-10-08T20:44:48+5:30

साप आल्याचे पाहताच पिल्लू मांजरीमागे जाऊन लपले अन् मांजर पुढे आली.

Viral Video Cat attacks python snake to protect her kitten from poisonous reptile watch social media trending | Video: आईचं धाडस!! पिलांना वाचवण्यासाठी थेट सापाशी भिडली मांजर, पुढे जे झालं ते...

Video: आईचं धाडस!! पिलांना वाचवण्यासाठी थेट सापाशी भिडली मांजर, पुढे जे झालं ते...

Cat Snake Video: सोशल मिडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही भयावह असतात आणि ते पाहण्याचे धाडस करणं कठीण जाते. त्याच वेळी, काही भावनिक व्हिडीओदेखील असतात ज्यामुळे लोक भावनिक होतात. सध्या अशाच एका धाडसी मांजरीचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामध्ये ती आपल्या मुलांना वाचवण्यासाठी सापाशी संघर्ष करताना दिसते.

व्हायरल क्लिपमध्ये, धोकादायक पायथॉन साप मांजरीच्या पिलांजवळ पोहोचतो. पिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्याचा त्याचा विचार असतो. त्याला पाहून मांजरीची दोन्ही पिलं घाबरून जातात आणि मांजरीच्या मागे लपतात. आपल्या पिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी मांजर पुढचा मागचा विचार न करता थेट पायथॉन सापावर हल्ला करू लागते आणि शेवटपर्यंत त्याचा संघर्ष करते. पाहा व्हिडीओ-

मांजरीची ही व्हिडीओ क्लिप X वर (@Rainmaker1973) नावाच्या खात्यावरून पोस्ट केली गेली आहे. 3 ऑक्टोबर रोजी शेअर केलेल्या या क्लिपला ७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. यावर लोकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title: Viral Video Cat attacks python snake to protect her kitten from poisonous reptile watch social media trending