शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:50 IST

ब्रिटनी म्हणाली की, सुरुवातीला ते फक्त मित्र होते, पण सततच्या संवादानंतर, त्यांच्या नात्याचे प्रेमात रुपांतर झाले. या काळात त्यांनी मित्रांसह मध्यपूर्व आणि थायलंडला प्रवासही केला.

एखाद्या तरुणीचं लग्न तिच्या नकळत चकून झालं असेल, यावर तुमचा विश्वास बसू शकतो का? मात्र, अमेरिकन पॉप स्टार ब्रिटनी पोर्टरने, आपला निकाह मलेशियाचे माजी राजा आणि केलंतनचे सुल्तान मुहम्मद पंचम यांच्याशी अनवधानाने झाला, असा दावा केला आहे. ब्रिटनीच्या मते, ती ज्याला एन्गेजमेंट समजत होती, तो प्रत्यक्षात तिचा निकाह होता. नंतर तिला समजले की हा समारंभ म्हणजे इस्लामी कायद्यानुसार विवाह होता. ती आता तलाक घेण्याचा विचार करत आहे.

‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, ब्रिटनी आणि सुल्तान यांची ओळख जानेवारी 2024 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाली. मित्रांच्या माध्यमातून झालेल्या या भेटीनंतर त्यांच्यात लगेचच जवळीक निर्माण झाली. ब्रिटनी म्हणाली की, सुरुवातीला ते फक्त मित्र होते, पण सततच्या संवादानंतर, त्यांच्या नात्याचे प्रेमात रुपांतर झाले. या काळात त्यांनी मित्रांसह मध्यपूर्व आणि थायलंडला प्रवासही केला.

एप्रिल 2024 मध्ये ओमानच्या प्रवासादरम्यान आपल्या नात्यात हे वळण आले. ब्रिटनीने सांगितले की, तेथे एका इमामला बोलावण्यात आले आणि आपले धर्मपरिवर्तन करण्यात आले. आपल्याला इस्लामसंदर्भात फारशी माहिती देण्यात आली नव्हती. त्या समारंभाला आपण एन्गेजमेंट समजत होतो. कारण दोघांनीही 2025 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर समजले की, तो कार्यक्रम म्हणजे, आपला निकाह, म्हणजेच विवाह होता.

यानंतर ते दोघे मलेशियाला परतले, तेथे ब्रिटनीला ‘चे पुआन’ ही शाही उपाधी देण्यात आली. मात्र, थोड्याच दिवसांत सुल्तानाचे वर्तन बदलू लागले. आम्ही येथे कपडे खरेदी केले. मात्र कपड्यांवरील खर्चामुळे सुल्ताना माझ्यावर नाराज झाले. नतंर, संवाद टाळणे अशा गोष्टी दिसू लागल्या. परिस्थिती अधिकच बिघडली, माझा गर्भपात झाल्यानंतर, माझ्यासोबतचे सुल्तानाचे वागणे पूर्णपणे बदलले. एवढेच नाही तर, त्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी माझ्यासोबतचे संबंध पूर्ण पणे तोडले. हे त्यांनी एका मैत्रिणीमार्फत सांगितले.




ब्रिटनीने पुढे सांगितले की, मी प्रचंड घाबरले आणि त्याला भाटण्यासाठी लॉस एंजेलिसहून मलेशियाला गेले. तेथे समजले की सुल्तान सिंगापूमध्ये आहे. मी सिंगापूरला गेले. तो फोर सीझन्सच्या सर्वात वरच्या मजल्यावर थांबलेला होता आणि रिसेप्शनवर मला वर जाण्याची परवानगी नव्हती. मी पायऱ्यांनी वर गेले. मात्र, सुल्तानने दरवाजा उघडला नाही. यानंतर मी तेथेच एक रूम घेतली. पण आमचे बोलणे होऊ शकले नाही. अखेर अर्ध्यारात्री तो विमानाने तेथून निघून गेला. 

ब्रिटनी म्हणाली, “मी एन्गेजमेंट समजत होते, पण पत्नी झाले आणि आता विभक्त आहे.” मी इस्लाममधील तलाक संदर्भात माहिती मिळवली आणि जुने मेसेज बघितले की, त्याने मला  तलाक तर नाही दिला? मात्र असे काहीही नव्हते. मला कधीही कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
 

English
हिंदी सारांश
Web Title : अमेरिकन पॉप स्टारने नकळत मलेशियाच्या सुलतानाशी विवाह केला, आता घटस्फोट हवा

Web Summary : अमेरिकन पॉप स्टार ब्रिटनीचा दावा आहे की, मलेशियाच्या सुलतानासोबत तिचं नकळत लग्न झालं. ओमानमध्ये अचानक विवाह समारंभांनंतर आणि गर्भपात झाल्यानंतर, सुलतानाने संबंध तोडले. आता तिला औपचारिक घटस्फोट हवा आहे, तिला तिच्या वैवाहिक स्थितीबद्दल स्पष्टता हवी आहे.
टॅग्स :Malaysiaमलेशियाmarriageलग्न