'इथे' झाडाखाली पडलेला आंबा उचलल्यास भरावा लागेल ४ लाख रूपये दंड, जाणून घ्या काय आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:47 IST2026-05-14T12:46:56+5:302026-05-14T12:47:40+5:30
Zara Hatke : आपण एखाद्या झाडाखाली पडलेलं फळ सहज उचलतो आणि खातो सुद्धा...पण एक असं ठिकाण आहे जिथे खाली पडलेलं फळ घेतल्यास किंवा झाडाचं फळ तोडल्यास मोठा दंड भरावा लागतो.

'इथे' झाडाखाली पडलेला आंबा उचलल्यास भरावा लागेल ४ लाख रूपये दंड, जाणून घ्या काय आहे कारण...
Zara Hatke : आपल्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या झाडाचं फळ किंवा आंबा खाली पडला असेल ते उचलणं आपल्याकडे कॉमन आहे. म्हणजे जर एखाद्या झाडाचं फळ खाली पडलं असेल तर ते उचलल्यावर शिक्षा होत नाही किंवा दंडही भरावा लागत नाही. पण सिंगापुरमध्ये झाडाखाली पडलेला आंबा उचलल्यास लाखो रूपयांचा दंड भरावा लागू शकतो. सिंगापुरमध्ये राहणारी भारतीय महिला प्रियंका सिन्हाने तेथील कठोर नियमांची माहिती एका व्हिडिओतून दिली आहे. जो खरंच भयानक आहे.
महिलेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत सांगितलं की, सिंगापुरमध्ये सार्वजनिक झाडांचे फळ तोडणे किंवा जमिनीवर पडलेलं फळ उचलणं बेकायदेशीर आहे. महिला सांगते की, जर एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक झाडाच्या खाली पडलेला आंबा उचलला तर त्याला ५ हजार सिंगापुरी डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार साधारण ३.५ लाख रूपये दंड भरावा लागू शकतो.
सिंगापुरमधील नियम फारच कडक
सिंगापुरच्या मिनिस्ट्री ऑफ नॅशनल डेव्हलपमेंटच्या वेबसाइट आणि पार्क्स अॅन्ड ट्रीज अॅक्टनुसार, सरकारी जमिनीवर लावण्यात आलेली झाडं आणि त्यांची फळं राज्यची संपत्ती आहेत. या झाडांची देखरेख नॅशनल पार्क बोर्डकडून केली जाते. कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने या झाडाचं खाली पडलेलं फळ घ्यायचं असेल किंवा झाडाचं फळ तोडायचं असेल तर आधी विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. विना परवानगी फळ तोडणं बेकायदेशीर आहे.
दंड आणि तुरूंगवासही
जर कुणी सार्वजनिक पार्कमधील पडलेलं फळ उचललं किंवा तोडलं तर त्याना साधारण ३.५ लाख रूपये दंड भरावा लागू शकतो. त्यासोबतच ६ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षाही होऊ शकते.